Delhi Crime News: खळबळजनक! कुत्र्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला; तरुणाने गर्लफ्रेंडच्या आईवर झाडली गोळी

Crime News Update: पोलिसांनी महिलेचे जबाब नोंदवून घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Dog News
Dog NewsSaam TV
Published On

Delhi Crime News: राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शुल्लक कारणावरुन वाद होण्याचे अनेक प्रकार दिल्लीमध्ये घडताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. कुत्र्यावरुन झालेल्या वादातून रागाच्या भरात तरुणाने थेट गर्लफ्रेंडच्या आईवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

Dog News
Pune News: दुर्देवी! पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू; ९० तास उलटून गेले तरी...

याबाबत अधिक माहिती अशी की, राजधानी दिल्लीतील देशबंधू रोडवर एका तरुणाने आपल्या मैत्रिणीच्या आईवर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका मुलीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. शनिवारी रात्री उशिरा त्याचा आपल्या मैत्रिणीच्या आईसोबत कुत्र्याबाबत काही वाद झाला होता. काही वेळातच हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ सुरू झाली. यानंतर रागाच्या भरात आरोपीने पिस्तूल काढून महिलेवर गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

Dog News
Sanjay Raut on Cm Eknath Shinde Ayodhya Visit: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून सत्ताधारी अयोध्येत, राऊतांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

यावेळी स्थानिक लोकांच्या मदतीने आरोपीच्या मैत्रिणीने तिच्या आईला रुग्णालयात नेले, तेथे उपचारानंतर डॉक्टरांनी प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे. या महिलेला सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी महिलेचे जबाब नोंदवून घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com