Sanjay Raut on Cm Eknath Shinde Ayodhya Visit: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून सत्ताधारी अयोध्येत, राऊतांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut on Cm Eknath Shinde : राऊतांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSAAM TV
Published On

Sanjay Raut Latest Press Conference: ''हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघालं आहे. हे ढोंग असून प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद यांना अजिबात मिळणार नाही'', असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील काही मंत्री आणि आमदार आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावरच टीका करताना राऊत असं म्हणाले आहेत.

राऊत म्हणाले आहेत की, ''काल मी पाहत होतो की, अयोध्यातील साधू संतांनी शिंदे सरकाराला पाठिंबा दिला आहे. कालपर्यंत या साधू संतांचा आशीर्वाद उद्धव ठाकरे यांनाही होता. उद्या आम्ही मुख्यमंत्रीही होऊ, तेव्हा पुन्हा आम्हाला आशीर्वाद असेल.'' (Latest Marathi News)

Sanjay Raut News
Cheapest Electric Cars: 'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा संपूर्ण लिस्ट

राऊत म्हणले की, महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून आपण (शिंदे-फडणवीस सरकार) गेलेला आहेत. प्रभू श्रीराम तुम्हाला (शिंदे-फडणवीस सरकारला) सुबुद्धी देओ.

Sanjay Raut on Cm Eknath Shinde Ayodhya Visit: 'अयोध्या ही राजकारणाची जागा नाही'

संजय राऊत म्हणाले आहेत की, ''अयोध्या हे आता पर्यटन धार्मिक तीर्थस्थळ आहे. आम्हीही जात असतो. आम्ही त्यांना रस्ता दाखवला. आम्ही त्यांना प्रभू रामाचं महत्व समजून सांगितलं. सत्ता असते तोपर्यंत जयजयकार होतोच. आम्ही ही जेव्हा जाऊ, तेव्हा अयोध्याची जनता आमच्या पाठीशी उभी राहील. मात्र ती जागा राजकारणाची नाही.'' (Sanjay Raut Latest News)

Sanjay Raut News
Gadchiroli Latest News : गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कट उधळला; दोन स्फोटके आणि 12 बोर रायफल जप्त

Sanjay Raut on Pm Narendra Modi Degree : खोटी पदवी हे प्रतिष्ठेचं लक्षण नाही, पंतप्रधान मोदी यांच्या पदवी वादावर राऊतांच वक्तव्य

देशाच्या पंतप्रधानाला पदवीची आवश्यकता नाही, तर विकासाची आवश्यकता आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, खोटी पदवी घेऊन पंतप्रधानांनी बसावं आणि त्यावर आपली भूमिका स्पष्ट करू नये, हे सुद्धा योग्य नाही. खोटी पदवी हे प्रतिष्ठेचं लक्षण नाही.

ते म्हणाले, देशात अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी पंतप्रधान यांची पदवी कशी खोटी आहे, हे समोर आणलं आहे. पंतप्रधान खोटं बोलत आहेत, खोटी पदवी दाखवत आहेत, हे चित्र चांगलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com