Shirdi Murder Case: Seven minors detained for killing Ganesh Chattar and selling his mobile to fund a birthday party.  Saam TV News
महाराष्ट्र

Shirdi Murder Case : शिर्डी हादरली! वाढदिवसाच्या पार्टीसाठी अपहरण केलं, चाकूने सपासप वार करत खून केला

Man murdered in Shirdi for birthday party : वाढदिवस साजरा करण्यासाठी ७ अल्पवयीन मुलांनी ४२ वर्षीय गणेश चत्तर यांचा खून केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत उघडकीस आली आहे. मृताचा मोबाईल साडेचार हजाराला विकल्याचे समोर आले. याच पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

सचिन बनसोडे, शिर्डी / अहिल्यानगर

Shirdi crime news latest today : वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले. त्यानंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली आहे. यासंदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मृत व्यक्तीचे नाव गणेश सखाहरी चत्तर असे आहे. या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील ४२ वर्षीय गणेश सखाहरी चत्तर हे ८ जूनपासून बेपत्ता होते. त्याच दरम्यान शिर्डी जवळील नांदुर्खी बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल १३ जून रोजी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

मयत व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या मृताचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला. दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला आणि त्यानंतर या खुनाला वाचा फुटली.

गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना उसाच्या कांडक्याने तसेच हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला. त्याच वेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाइल काढून घेतला. हा मोबाइल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला.पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती.त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस तपासात समोर आलंय. पोलिसांनी सात अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT