nashik, petrol pump, women saam tv
महाराष्ट्र

Crime News : पेट्राेल पंपावर महिलेवर वार; मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

या घटनेचा तपास इंदिरा नगर पोलीस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Crime News : पाथर्डी गाव वडनेर रस्ता (nashik) येथील जाधव पेट्रोलियम पंपावर काम करणाऱ्या महिलेवर एकाने आज वार केले. या घटनेमुळं पेट्राेल पंपावर एकच गाेंधळ उडाला. या पंपावरील अन्य कर्मचा-यांनी (workers) महिलेस (women) मारहाण हाेण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मारहाण करणारा तेथून पसार झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

जुबेदा खान असं मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. जुबेदा या पंपावर काम करतात. त्या नेहमीप्रमाणे कामावर आल्या हाेत्या. एका रिक्षात पेट्राेल भरत असताना एक पुरुष घटनास्थळी आला. त्याने त्यांना मारहाण करण्यास प्रारंभ केला. स्वत:चा बचाव करण्यासाठी जुबेदा हा तिथून पळू लागल्या.

संबंधिताने त्यांचा पाठलाग करीत मारहाण केली. जुबेदा यांना वाचविण्यासाठी पंपावरील कर्मचारी प्रयत्न करीत हाेते. परंतु संबंधिताने काहींना मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ पंपावर गाेंधळ निर्माण झाला. घटनास्थळी गर्दी वाढू लागताच मारहाण करणा-याने तेथून पळ काढला.

दरम्यान जुबेदा यांना पंपावरील कर्मचा-यांनी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. भर दिवसा पेट्रोल पंपावर झालेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा तपास इंदिरा नगर पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT