Former MLA Vaibhav Naik walks free after Kudal court acquits him in the Malvan PWD office vandalism case. saamtv
महाराष्ट्र

Vaibhav Naik: सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय तोडफोड प्रकरणी ठाकरे गटाला दिलासा; माजी आमदार वैभव नाईकांची निर्दोष मुक्तता

Former Mla Vaibhav Naik: २०२४ मध्ये मालवण सार्वजनिक बांधकाम कार्यालय तोडफोड झाली होती. याप्रकरणात माजी आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलंय.

Bharat Jadhav

  • मालवण सार्वजनिक बांधकाम विभाग तोडफोड प्रकरण

  • शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर झाली होती तोडफोड

  • कुडाळ न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष असल्याचं म्हटलंय.

विनायक वंजारे, साम प्रतिनिधी

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. यावेळी आक्रमक झालेल्या माजी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयात धडक देत कार्यालयाची तोडफोड केली होती. या तोडफोड प्रकरणी कुडाळ न्यायालयाने वैभव नाईक यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. २६ ऑगस्ट २०२४ ला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला घेरावा घालून तोडफोड करण्यात आली होती.

राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या नंतर माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड केली होती. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमी संतप्त झाले होते. माजी आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.

आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. याप्रकरणी काल रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरण काय होतं?

भारतीय नौदलाच्या वतीने ४ डिसेंबर २०२३ चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. मात्र दुर्दैवाने हा पुतळा कोसळला. काही महिन्यापूर्वीच महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बड्या-बड्या नेत्यांशी थेट पंगा ते धर्मांतराला विरोध; गोपीचंद पडळकरांची Exclusive मुलाखत पाहा|VIDEO

Maharashtra Live News Update: सुनील तटकरे यांची भरत गोगावलेंवर टीका

Tomato Rice Recipe: जेवणासाठी बनवा हॉटेल सारखा चमचमीत टोमॅटो भात, खाणारे खातच राहतील

Maharashtra TET: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा होणार रविवारी; CCTV कॅमेरे,फिंगर प्रिंट स्कॅनिंग, बायोमेट्रिक परीक्षा केंद्रावर तगडी व्यवस्था

Dehydration: तुम्ही दिवसाला अर्धा लिटरपेक्षा कमी पाणी पिताय? तर शरीरावर होतील गंभीर परिणाम, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT