माळशिरस येथील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर (uttam jankar) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात स्वतः उत्तम जानकर यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात (politics) चर्चांना उधाण आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जानकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला साेडचिठ्ठी दिल्यास माढ्यात अजित पवार गटाला (ajit pawar faction) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मी जन्मजातच भाजपमध्ये आहे. मध्यल्या काळात काही राजकीय तडजोडीमुळे राष्ट्रवादीत गेलो असलो तरी मी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानानंतर लवकरच ते अजित पवारांना सोडून भाजपमध्ये (bjp) प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra News)
जानकर हे सोलापूर लोकसभा मतदार संघातून (solapur lok sabha constituency) भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तशी चाचपणी देखील सुरू केली आहे.
जानकर हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून ही त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान उत्तम जानकर यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.