Malshej Ghat Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Malshej Ghat Accident: माळशेज घाटात भीषण अपघात! भरधाव कार झाडावर आदळली, २ जागीच ठार; वळणाचा अंदाज न आल्याने अनर्थ घडला

Malshej Ghat Latest News: माळशेज महामार्गावरील घाटात रात्री कासार पुलाजवळ कार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

फय्याज शेख, ता. ५ ऑगस्ट २०२४

माळशेज घाटातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मुरबाड तालुक्यातील कल्याण मुरबाड माळशेज महामार्गावरील घाटात कासार पुलाजवळ इर्टिका कारचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण अपघातांचे सत्र सुरू आहे. रविवारी रात्री माळशेज घाटातही एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुरबाड तालुक्यातील कल्याण मुरबाड माळशेज महामार्गावरील घाटात रात्री कासार पुला जवळ इर्तिका कार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुर्घटनेतील मृत व जखमी सर्व कल्याण व रेवती येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या वेळी माळशेज घाटातील रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव अर्टिगा कार एका झाडावर जाऊन आदळल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पालघरमधूनही एक मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. पालघरच्या दांडा खाडी येथे चार दुचांकींचा मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. पाऊस सुरू असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने चार भरधाव बाईक एकमेकांना धडकल्या. या अपघातामध्ये सात जण जखमी झालेत. सध्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू असून चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीत बनवलेली शेव उरले असून मऊ झालेत? पाहा ते पुन्हा कुरकुरीत कशी बनवावे?

भीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस थेट १५० फूट खोल दरीत कोसळली, एकाचा मृत्यू

Blind Restaurant: डोळ्यांनी नाही, संवेदनांनी अनुभवा जेवण; दृष्टिहीनांसारखे जगण्याचा अनुभव देणारा उपक्रम

Pune Airport News : आनंदाची बातमी! पुण्यातून विमानाने काही तासांत अबू धाबीला जाता येणार, जाणून घ्या वेळापत्रक

Maharashtra Live News Update : सातपुड्यातील देवगोई घाट परिसरात स्कूल बसच्या भीषण अपघात

SCROLL FOR NEXT