विनोद जिरे, साम प्रतिनिधी
राज्यातील राजकारणातील शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय चढाओढ सर्वांना माहितीये. एककडे राजकारणातील काका आणि पुतण्याचं राजकीय वादंग सुरू असतांना, दुसरीकडे मात्र बीडच्या माजलगाव विधानसभा मतदार संघात मोठी घडामोड झालीय. बीड जिल्हा म्हटलं की, येथे नेहमी काही ना काही राजकीय उलथापालथ होत असते. यामुळे हा जिल्हा नेहमी चर्चेत असतो. आता बीडमधील काका प्रकाश सोळंके यांनी पुतण्या जयसिंह सोळुंके यांना आपला राजकीय वारसदार जाहीर केले, यामळे बीड जिल्हा काका-पुतण्यामुळे चर्चेत आलाय.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार, काका प्रकाश सोळंके यांनी, पुतण्या जयसिंह सोळुंके यांना आपला राजकीय वारसदार जाहीर केलं. एवढेच नाही तर " तुम्ही जशी मला साथ दिली, तशी खंबीर साथ जयसिंहला द्या" असं आवाहन देखील आमदार काकांनी कार्यकर्त्यांना केलं. ते माजलगावमध्ये कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते. दरम्यान यामुळं आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलयं.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शकले झाली. आपल्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी शरद पवार यांनी द्यावीत,इच्छा अजित पवार यांची होती. मात्र काका शरद पवार यांनी त्याला साद घातली नाही. त्यानंतर अजित पवार यांनी आपला वेगळा मार्ग निवडला.
संघर्ष टळला
मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रकाश सोळंके यांनी मात्र आपले पुतणे जयसिंह सोळंके यांना आपला राजकीय वारसदार बनवलं. प्रकाश सोळंके यांच्या या निर्णयामुळे काका-पुतण्यामधील संघर्ष टळला. मागच्या विधानसभा निवडणुकीत आपली शेवटची निवडणूक असल्याच आमदार प्रकाश सोळंके म्हणाले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी ते सातत्याने प्रयत्नशिल होते. सोळंके यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू झाली.
पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर पराभूत झालेले प्रकाश सोळंके १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी घेत माजलगाव मतदारसंघातून विजयी झाले. दोन टर्म भाजपकडून आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ हातात घेतली आणि आमदार झाले. या काळात त्यांनी साडेचार वर्षे महसूल, भूकंप पुनर्वसन आदी खात्यांचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.