बारामती, ता. ४ ऑगस्ट २०२४
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी, मिश्किल उत्तरांसाठी ओळखले जातात. जाहीर सभा, पत्रकार परिषदांमधून दादांनी लगावलेले टोले राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही असाच मिश्किल टोला लगावला, ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नेमकं काय म्हणाले अजित पवार? वाचा...
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीमध्ये अजित पवार यांचा जनता दरबाराला हजेरी लावली तसेच विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी शहरातील शारदा प्रांगणात अजित पवार यांच्या 65 वाढदिवसानिमित्त हजार वृक्ष वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमामध्ये अजित पवार यांचे भाषण भाषण सुरू असताना काही अतिउत्साही कार्यकर्ते 'एकच वादा अजितदादा' अशा घोषणांचा नारा देत कार्यक्रम स्थळी आले. यावेळी घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते इतके उत्साहात होते की अजित पवारांना आपलं भाषण थांबवावे लागले पण अजित पवार एवढ्यावरच न थांबता त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना "आरे थांबा जरा बसा खाली हा वादा लोकसभेला कुठ गेला होता, कुणास ठाउक?" असे म्हणत हात जोडले. दादांच्या या कोपरखळीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, आजच्या बारामती दौऱ्यावेळी अजित पवार यांनी धरणांमधील वाढत्या पाण्याचा आढावा घेत प्रशासनाला सूचना दिल्या. पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेवून नागरीकांना तशा सुचना द्याव्यात, तसेच नागरिकांना पाण्याच्या विसर्गाबद्दल माहिती व्हावी, या अनुषंगाने विविध माध्यमातून माहिती देवून सतर्क राहण्याबाबत कळवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.