Malegaon Leopard Saam tv
महाराष्ट्र

Malegaon Leopard : शाब्बास रे पठ्ठ्या! जिगरबाज मुलानं बिबट्याला केलं जेरबंद; धाडसाचं सर्वत्र कौतुक, व्हिडिओ व्हायरल

Nashik Malegaon Leopard News : हिंसक बिबट्या वस्तीत येऊनही मोठ्या धाडसाने एका लहानग्याने स्वत:चा जीव वाचवला आहे. या जिगरबाज मुलाचं राज्यभरात कौतुक होत आहे.

Vishal Gangurde

Nashik Malegaon Leopard News in marathi :

बिबट्याचं नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. आतापर्यंत बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण पट्ट्यात राहणारे लोक बिबट्या किंवा इतर हिंसक प्राण्यापासून चार हात लांबच राहतात. मात्र, आजकाल या धोकादायक प्राण्यांचा लोकवस्तीमध्ये वावर वाढला आहे. असाच हिंसक बिबट्या वस्तीत येऊनही मोठ्या धाडसाने एका लहानग्याने स्वत:चा जीव वाचवला आहे. या जिगरबाज मुलाचं राज्यभरात कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

नाशिकच्या मालेगाव शहरातील नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये सकाळच्या सुमारास बिबट्या घुसल्याची घटना घडली. लॉन्सच्या ऑफिसमध्ये टेबलवर बसलेल्या मोहित आहिरे या लहान बालकाने बिबट्या आत शिरल्याचे पाहिले. बिबट्या ऑफिसमध्ये शिरल्याचे पाहूनही तो घाबरला नाही.

मोहितने न घाबरता प्रसंगावधान राखत ऑफिसचा दरवाजा हळूच बंद करत बिबट्याला जेरबंद केले. बिबट्याला ऑफिसमध्ये जेरबंद केल्यामुळे मोहित जीव वाचविण्यास यशस्वी झाला. बिबट्याला ऑफिसात जेरबंद केल्यानंतर घरी जाऊन त्याने वडिलांना ही घटना सांगितली.

मोहितने दाखवलेल्या धाडसाचे मात्र संपूर्ण मालेगाव शहरात कौतुक होत आहे. मोहितच्या धाडसाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मोहित अहिरेने सांगितलं की, 'मी सकाळी ऑफिसमध्ये बसलो होतो. सकाळी साडे सातच्या सुमारास अचानक बिबट्याने एन्ट्री मारली. माझ्या बाजूने बिबट्या गेला. माझ्यावर हल्ला करेल म्हणून मी बिबट्याला पाहून शांत झालो. ऑफिसात बिबट्या पुढे गेल्याने पटकन उतरून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर तातडीने घरी धाव घेतली. घरी गेल्यानंतर वडिलांनी ही बाब सांगितली. या सर्व प्रकारानंतर पोलीस आले'. नाशिकच्या मालेगावमध्ये घडलेली घटा

मोहितने वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले. बिबट्यामुळे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी वैभव हिरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे बचाव पथक साडेदहाच्या सुमारास येथे दाखल झाले. या पथकाने कार्यालयाची खिडकी उघडून बिबट्याची पाहणी केली.

या बिबट्याला खिडकीतून ब्लो पाईपने डॉट देत बेशुद्ध केले. या बिबट्यासाठी दोन तासांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं वन विभागाने रेसक्यु करत विशेष वाहनातून बिबट्याला वन विभागाच्या कार्यालयात आणले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

SCROLL FOR NEXT