A political storm brews in Malegaon after AIMIM’s claim about Shiv Sena seeking support for civic power. saam tv
महाराष्ट्र

Malegaon Politics: ज्यांच्या विरोधात लढले त्यांचाच मागितला पाठिंबा? मालेगावातील राजकारण ३६० डिग्री फिरणार; शिंदेंनी थेट ओवौसींकडे मागितला मदतीचा हात

Malegaon Municipal Corporation: मालेगाव महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने पाठिंबा मागितला आहे, असा दावा एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी केलाय. खुद्द दादा भुसे यांनी त्यांना कॉल केल्याचा दावा त्यांनी केलाय.

Bharat Jadhav

  • मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली

  • शिवसेनेने एमआयएमचा पाठिंबा मागितल्याचा दावा

  • इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ

मालेगाव महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने MIMचा पाठिंबा मागितलाय. त्यासाठी खु्द्द मंत्री दादाजी भुसे यांनी इम्तियाज जलील यांना फोन केल्याचा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षानं धमाकेदार विजय मिळवत अनेकांना थक्क केलं.

अवघ्या दीड वर्षापूर्वी माजी आमदार आसिफ शेख यांनी स्थापन केलेल्या या पक्षाने पहिल्याच प्रयत्नात कमाल केली. इस्लामी पार्टीनं सर्वाधिक ३५ जागा जिंकत बाजी मारली. इस्लामी पार्टीनं महापालिकेत समाजवादी पक्षाशी युती केली होती. पण समजावादी पक्षाला मात्र ५ जागा जिंकता आल्या. मात्र एमआयएमच्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केलाय.

दरम्यान शिवसेनेने पाठिंबा मागितला असला तरी आम्ही शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणार नाही असंही जलील यांनी स्पष्ट केलं. भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोडून इतर कुणालाही सकारात्मक पाठिंबा देऊ, असे इम्तियाज जलील म्हणालेत. भाजप शिवसेनेला बाहेर ठेऊन इतर पक्ष एकत्र येत असतील आणि सन्मानाने आम्हाला विचारणा करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ असेही जलील म्हणाले.

कॉंग्रेसने तसेच शिवसेना शिंदे गटानेदेखील एका ठिकाणी आमचे समर्थन मागितले आहे, असा दावा त्यांनी केला. मात्र आम्ही स्पष्ट शब्दात नकार दिला. तर जलील यांनी केलेल्या दाव्यावर मंत्री दादा भुसे काय खुलासा करतात हेही पाहावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मालेगाव सारख्या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाही असं जलील म्हणालेत.

दुसरीकडे कोल्हापुरमध्ये काँग्रेस- शिवसेना शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. येथे शिवसेना शिंदे गट किंगमेकरच्या भूमिकेत आहे. अशा स्थितीत शिवसेनेला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील तसे प्रयत्न देखील करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महापौर पदाबाबत आमदार सतेज पाटील यांना कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेनेची युती होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी बॅकडोअर चर्चा असल्याचं म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आई महापालिकेत सफाई कामगार; आता त्याच पालिकेत मुलगा नगरसेवक म्हणून बसणार

Konkan Politics: ऐन झेडपीच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; धडाधड ४३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबईच्या महापौर निवडीवरून ट्विस्ट; जुनी रोटेशन पद्धत बदलणार, कोणाला मिळणार संधी?

Tuesday Horoscope: पैशाची तंगी होणार दूर, ४ राशींची होणार भरभराट; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Gold-Silver Price: सोन्यानंतर चांदीही चमकली; जाणून घ्या दिवसाअखेरचा सोने-चांदीचा दर

SCROLL FOR NEXT