hingoli news Saam tv
महाराष्ट्र

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

hingoli politics : शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे होते. त्यामुळे नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढल्याचे समोर आले आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोलीत सेनेच्या एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे

20 शिवसेना उमेदवारांकडून एबी फॉर्म नसल्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल

जयप्रकाश मुंदडा यांनी शिंदेंना भेटून प्रकरणाची माहिती दिली

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी हिंगोलीमधून पुढे आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेले एबी फॉर्म चक्क राष्ट्रवादीच्या आमदाराने उमेदवारांना वाटप केल्याचा गंभीर प्रकार हिंगोलीच्या वसमत नगरपरिषदेच्या निवडणुकीत घडला आहे. राज्याचे माजी सहकार कॅबिनेट मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी हा धक्कादायक आरोप केला आहे.

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्याकडे शिवसेनेचे एबी फॉर्म दिल्याचं मुंदडा म्हणाले आहेत. एबी फॉर्म मिळाले नसल्याने शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता मारुती क्यातमवार यांच्यासह नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उभ्या असलेल्या वीस उमेदवारांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आहे.

या सगळ्या प्रकारानंतर माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ही सगळी माहिती दिलेली आहे ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता वसमत पालिकेत अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या या उमेदवारांना शिवसेना पुरस्कृत म्हणून घोषित करा, असे आदेश दिल्याचे देखील जयप्रकाश मुंदडा म्हणाले आहेत. तर भाजपचे नेते शिवदास बोडेवार यांनी देखील राष्ट्रवादीच्या आमदाराकडे शिवसेनेचे एबी फॉर्म असल्याचे सांगितले आहे

या सगळ्या प्रकारानंतर आमदार चंद्रकांत नवघरे आणि शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मात्र अद्याप प्रतिक्रिया दिली नसल्याने ते या प्रकरणात काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

Maharashtra News Live Update:एसआयआर मोहिमेदरम्यान महिला बीएलओला धक्काबुक्की, मायलेकीवर गुन्हा दाखल

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT