Sharad pawar  Saam t
महाराष्ट्र

शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा; बड्या नेत्याचा पक्षाचा तडकाफडकी राजीनामा

Sharad Pawar : शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा बसलाय. बड्या नेत्याने तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिलाय.

Vishal Gangurde

शरद पवार गटाच्या युवक जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा दिलाय

विश्वजीत पाटील यांनी वैयक्तिक कारण देऊन राजीनामा दिलाय

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मोठा धक्का बसलाय

राज्यात सर्वत्र महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. जळगावातही महापालिका निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीदरम्यान शरद पवारांना मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाच्या जळगाव युवक जिल्हाध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

जळगावमधील शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. विश्वजीत पाटील यांनी वैयक्तिक कारण पुढे करून पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. पाटील यांनी राजकीय हेतूने राजीनामा दिला असावा, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून विश्वजीत पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सक्रिय होते. त्यांनी पाच महिन्यात पक्षाचं युवक संघटन जिल्हापातळीवर मजूबत करण्याचा प्रयत्न केला. विविध आंदोलनांमध्ये विश्वजीत पाटलांनी विशेष सहभाग नोंदवला होता.

विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून संघटन बांधणी आणि स्थानिक पातळीवर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सातत्याने आंदोलन केल्यामुळे प्रभाव युवक म्हणून ओळख निर्माण केली होती. मात्र, त्यांनी दिलेल्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अनेक बडे सोडून गेल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या संघटनात्मक मजबुतीवर भर दिला जात होता. त्याचवेळी युवक संघटनेतील जिल्हास्तरीय नेतृत्वाचा राजीनामा पक्षासाठी मोठे आव्हान ठरू शकतो, असे बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मोठी बातमी! २६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

Fish bone in throat: माशाचा काटा घशात अडकला, संसर्ग वाढत गेला आणि अचानक हार्ट अटॅक; डॉक्टरांच्या मेहनतीने रूग्णांचा वाचला जीव

Maharashtra News Live Update: सिव्हिल ड्रेसवरील लोकांकडे पोलिसांकडे काठ्या कशा, उद्धव ठाकरेंचा सवाल

Mumbai Local : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता दर २ मिनिटांनी धावणार लोकल, काय आहे रेल्वेचा नवा प्लान?

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT