nagpur politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का; सलील देशमुख यांचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

Maharashtra Political News : ऐन निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का बसलाय. अनिल देशमुखांचे सुपुत्र सलील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.

Vishal Gangurde

सलील देशमुख यांनी राजीनामा दिला.

सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे सुपुत्र आहेत

राजीनाम्यामुळे नागपूरच्या राजकीय वातावरणात खळबळ

सलील यांचा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे

पराग ढोबळे, साम टीव्ही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. नागपुरातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्याने नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सलील देशमुख यांनी शरद पवारांना पत्र लिहून राजीनामा सोपवला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी शरद पवार गटाच्या सक्रिय सदस्यतेचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी पक्षाचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना अचानकपणे प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला आहे. डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी आराम करत आहे, असं त्यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे.

सलील देशमुख यांनी राजीनाम्यात काय म्हटलं?

सलील देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'गेल्या २०-२२ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी पक्षात सक्रिय आहे. नागपूर जिल्हा, शहर व विदर्भ येथे प्रामुख्याने युवकांच्या बांधनीसाठी केलेल्या प्रयत्नामध्ये कधी यश तर कधी अपयश आलं'.

'मागील काळात मी नागपूर जिल्हा परिषद सदस्य असताना विकासावर भर देत अनेक मोठे विकास कामे आणि प्रकल्प सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन आपल्या परिसरासाठी आणलं. यात आपण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी आणि नेत्यांनी भरपूर सहकार्य केले याचा मला अभिमान आहे. परंतु काही महिण्यापासून माझे आरोग्य योग्य नसल्यामुळे काही दिवस (६ महीने) मी कार्यरत राहु शकत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारावा, ही विनंती, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

Maharashtra Politics: निवडणुकीचे बिगुल वाजताच अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

Kitchen Hacks : बटाटे कापल्यावर लगेच काळपट पडतात? मग फॉलो करा या टिप्स

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

SCROLL FOR NEXT