Eknath Shinde Saam tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, नेमकं कारण काय?

Eknath Shinde Shiv Sena : जालन्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे. जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत तालुकाप्रमुखांसह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे, जालना प्रतिनिधी

जालन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील सर्व तालुकाप्रमुखांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या मनमानी कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ए. जे. बोराडे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली. मात्र, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलून बोराडे स्वतःच्या मर्जीने पक्षाचे सर्व उपक्रम राबवत असल्याचा आरोप करत, मंठा येथील तालुकाप्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सामूहिक राजीनामा पाठवला आहे.

जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्यावर गंभीर आरोप

"गेल्या वर्षभरापासून आम्हाला पक्षात सातत्याने डावलले जात आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 'आनंदाचा शिधा' पाठवला होता. मात्र, त्याच्या वाटपासाठी एकाही स्थानिक कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला बोलावण्यात आले नाही. त्यांनी स्वतःच्या नातेवाइकांच्या आणि मर्जीतील लोकांच्या हस्ते शिधावाटप केले. शिंदे साहेबांच्या सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच हा प्रकार करण्यात आला," असा गंभीर आरोप तालुकाप्रमुख उदय बोराडे यांनी जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्यावर केला आहे.

"शिंदे साहेबांनी आता योग्य निर्णय घ्यावा"

राजीनामा सत्रानंतर पत्रकारांशी बोलताना पदाधिकारी म्हणाले, "आमची पक्षावर किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर कोणतीही नाराजी नाही. आमचा विरोध फक्त आणि फक्त स्थानिक जिल्हाप्रमुखांच्या मनमानी कारभाराला आहे. आम्ही सर्वांनी स्वाक्षरी केलेले सामूहिक राजीनामे थेट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवणार असून, आता यावर शिंदे साहेबांनीच योग्य तो निर्णय घ्यावा."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदारांचे वेतन बंद करा, पण दिव्यांगांचे मानधन वाढवा! रवी राणांची मोठी मागणी

Dizziness : चालता चालता अचानक चक्कर आली? घाबरू नका, जीव वाचवण्यासाठी तातडीने करा 'ही' ३ काम

Diwali Bonus 2026 : दिवाळीत कर्मचाऱ्यांना मिळाला छप्परफाड बोनस, मालकाने थेट लाखोंची भेट दिली; VIDEO चर्चेत

राजधानी हादरली! निर्माणाधीन इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरूच

Walking After Dinner: जेवल्यानंतर शतपावली करण्याचे ७ भन्नाट फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT