BJP News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: चंद्रपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड, सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का

Chandrapur Political News: चंद्रपूरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चंद्रपूर भाजपच्या नव्याने घोषित करण्यात आलेल्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला स्थगिती देण्यात आली.

Priya More
  • चंद्रपूर भाजपच्या ग्रामीण कार्यकारिणीला स्थगिती

  • निर्णयामुळे सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का

  • कार्यकारिणी निवड प्रक्रियेवर पक्षांतर्गत नाराजी होती

  • वरिष्ठ नेत्यांच्या तक्रारीनंतर पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूर भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून धगधगत असलेल्या अंतर्गत वादाचा अखेर जाहीर स्फोट झाला आहे. चंद्रपूर भाजपच्या नव्याने घोषित करण्यात आलेल्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांच्या स्वाक्षरीने हे स्थगितीचे पत्र २९ जून रोजी जारी करण्यात आले. यामुळे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसला आहे.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा हे मुनगंटीवार यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे शर्मा यांनी जाहीर केलेली कार्यकारिणी स्थगित करणे, ही बाब मुनगंटीवार यांच्या जिव्हारी लागणारी आहे. चंद्रपूर भाजपच्या इतिहासात ग्रामीण कार्यकारिणीला अशाप्रकारे स्थगिती देण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे भाजप वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी गेल्या ४ जून २०२६ रोजी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी मोर्चा आणि विविध प्रकोष्ठांच्या पदाधिकाऱ्यांची यादी घोषित केली होती. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे बॅनरही जिल्हाभर झळकले होते. मात्र, या कार्यकारिणीत काही विशिष्ट नेत्यांनाच झुकते माप देण्यात आल्याचा आरोप झाला.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह जिल्ह्यातील इतर विद्यमान आमदारांना या संपूर्ण प्रक्रियेत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले, असा आक्षेप घेण्यात आला. कोणालाही विश्वासात न घेता ही एकतर्फी घोषणा घाईघाईने करण्यात आल्यामुळे पक्षात तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या दुजाभावामुळे संतप्त झालेल्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांची भेट घेऊन या वादग्रस्त कार्यकारिणीवर तीव्र आक्षेप नोंदवला. या वरिष्ठ पातळीवरील 'फील्डिंग'नंतर थेट कारवाई करण्यात आली आहे.

प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, '४ जून २०२६ रोजी घोषित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी, मोर्चा व प्रकोष्ठ पदाधिकारी यादीस प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा रत्नागिरीमध्ये मूक मोर्चा

Police Suspended: ९ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात खळबळ

23 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; CM कार्यालयात मोठे फेरबदल, कोणाची कुठे नियुक्ती?

Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT