Yavatmal Congress Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal Congress: यवतमाळमध्ये काँग्रेसला खिंडार! नगरपंचायत उपाध्यक्षांसह ५ नगरसेवकांनी सोडली साथ, हाती घेतलं धनुष्यबाण

Yavatmal Congress Leader Join Shivsena Shinde Group: यवतमाळमध्ये काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसला. काँग्रेसच्या नगरपंचायत उपाध्यक्षांसह ५ नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलंं.

Priya More

यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्षांसह ५ नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकला. या सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसच्या ५ पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. आमदार भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरी यांच्यासह ५ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

काँग्रेस नगरपंचायत उपनगराध्यक्ष जानराव गिरी, नगरसेवक भानुदास राऊत, नगरसेवक प्रतीक बोबडे, नगरसेवक गणेश कुडमते यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. तर या पक्षप्रवेशामुळे यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. या नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातच यवतमाळमध्ये काँग्रेसला धक्का बसला होता. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या दोन माजी आमदारांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतील तिकीट वाटपावरून नाराज झाल्यामुळे या माजी आमदारांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपचे कमळ हाती घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT