Jalgaon Congress : काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार राडा; कार्यकर्ते एकमेकांवर गेले धावून, नेमका काय आहे वाद

Jalgaon News : जळगाव काँग्रेसच्या जिल्हा बैठक जिल्हा काँग्रेस भवन येथे बोलाविण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांची देखील उपस्थिती होती. याच बैठकीत आज जोरदार गोंधळ
Jalgaon Congress
Jalgaon CongressSaam tv
Published On

जळगाव : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आज आयोजित जिल्हा बैठकीत जोरदार राडा झाला. यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह विधानसभेचे पराभूत उमेदवाराच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद होऊन दोघांचे कार्यकर्ते एकमेकांवर धाऊन गेल्याचा प्रकार पहायला मिळाला. काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी सचिव बी. एम. संदीप त्यांच्यासमोरच हा राडा झाल्याने बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. 

जळगाव काँग्रेसच्या जिल्हा बैठक जिल्हा काँग्रेस भवन येथे बोलाविण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांची देखील उपस्थिती होती. याच बैठकीत आज जोरदार गोंधळ झाल्याचे बघावयास मिळाले. सदर बैठकीत बोलू न दिल्याच्या कारणावरून जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार अनिल शिंदे समर्थकांमध्ये वाद झाला. 

Jalgaon Congress
Leopard Attack : जेवण केल्यानंतर हात धुण्यासाठी अंगणात गेली; चिमुकलीवर बिबट्याची झडप, रात्रीची थरारक घटना

बोलू न दिल्यावरून वाद 

बैठक सुरू झाल्यानंतर काही जणांनी काँग्रेसचे सचिव संदीप यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली. या बैठकीत अनिल शिंदे यांना देखील बोलायचे होते. मात्र काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी म्हटले आहे की बैठकीचे आपण अध्यक्ष आहोत. कोणी बोलायचे हे आपण ठरविणार. जो आपले ऐकणार नाही त्यांना सभागृहाचा बाहेर जावे लागेल असे जाहीर केले, त्यांच्या या बोलण्यावरून सुरू झालेला वाद हा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचला. 

Jalgaon Congress
Nashik Crime : भांड्याच्या दुकानात धाडसी चोरी; ३५ लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरी गेल्याने खळबळ

काँग्रेसची अंतर्गत गटबाजी आली समोर

दरम्यान बैठकीतील गोंधळानंतर जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व अनिल शिंदे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. यात प्रदीप पवार यांनी अनिल शिंदे हे काँग्रेसच्या पदाधिकारी नसून सहसचिवांच्या म्हणण्यानुसार जास्त भाषणबाजी करायची नव्हती. मात्र शिंदे यांच्या कडून काँग्रेस जिल्हाध्यक्षांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तर अनिल शिंदे यांनी म्हटले कि, अनुभव मांडून येथील वस्तुस्थिती सांगायची होती. पण बोलू दिले नाही. निवडणुकीत पवार आले नाहीत. पक्षाने दिलेल्या निधीतून २ लाख त्यांनी घेतल्याचे म्हटले आहे. पक्ष नाही माणसे वाईट असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com