Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता मशाल सोडून कमळ हाती घेणार

Maharashtra Political news : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. बडा नेता मशाल सोडून कमळ हाती घेणार आहे.

Vishal Gangurde

माजी आमदार बदामराव पंडित आणि बाळराजे पवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता

विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित यांना राजकीय आव्हान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. बीडमधील गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे देखील पवार देखील भाजपशी जवळीक करणार आहेत. या नेत्यांची भाजपशी जवळीक वाढणार असल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गेवराईत मोठा हादरा बसणार आहे.

'सकाळ'च्या वृत्तानुसार, बीडच्या गेवराईमधील राजकारणात पवार आणि दोन पंडित यांचं नाव आघाडीवर आहे. शिवाजीराव पंडित आणि बदामराव पंडित यांनी तीन वेळेस आमदारकी मिळाली आहे. लक्ष्मण पवार यांना दोन वेळा आमदारकी मिळाली आहे.

अमरसिंह पंडित, दिवंगत माधवराव पवार, शाहुराव पवार यांना प्रत्येकी एकदा आमदारकी मिळाली आहे. आता गेवराईत विजयसिंह पंडित हे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे बदामराव पंडित यांचा त्यांचे पुतणे विजयसिंह पंडित यांनी ४० हजार मतांनी पराभव केला.

बदामराव पंडित यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर बदामराव पंडित हे मशाल सोडून कमळ हाती घेणार असल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदामराव पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बदामराव पंडित यांच्या पक्षप्रवेशाने ठाकरे गटाला गेवराईत मोठा हादरा बसणार आहे. तर बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल. दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांना येणार्‍या आगामी निवडणुकीत मोठं आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT