Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Political News : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. विश्वासू नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political News saam tv
Published On
Summary

अजित पवारांच्या गटाचे नेते शेखर पाचुंडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

स्वाती पाचुंडकर यांचाही भाजपमध्ये पक्षप्रवेश

दोन नेत्यांच्या प्रवेशामुळे पुणे ग्रामीण भागात वाढली भाजपची ताकद

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने विविध ठिकाणी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपनेही पुणे ग्रामीणमध्ये मोर्चा वळवलाय. भाजपचा आता पुणे जिल्ह्यावर डोळा आहे.

भाजप जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यांवर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका वर्षभरापूर्वी अजित पवार गटातील नेते शेखर पाचुंडकर यांना पक्षात प्रवेश केला होता. शेखर पाचुंडकर यांचा आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठा दबदबा आहे.

Maharashtra Political News
Actress Death : सिनेसृष्टीला दुहेरी धक्का, प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; चाहत्यांवर शोककळा

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये शेखर पाचुंडकर यांनी अजित पवार गटाला पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना आंबेगाव तालुकाध्यक्षपदही बहाल करण्यात आलं होतं. आता पाचुंडकर यांनी तुतारीची साथ सोडून कमळ हाती घेतलं आहे. पाचुंडकर यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Political News
Language Conflict : भाषावाद पेटला; हिंदी चित्रपट आणि गाण्यावर बंदी घालणार? दक्षिण भारतातील राज्य मोठा निर्णय घेणार

शेखर पाचुंडकर हे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे. त्यामुळे पाचुंडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पाचुंडकर यांचं शिरुरच्या ४२ गावांमध्ये मोठं वलय आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले शेखर पाचुंडकर आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंडकर यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला.

Maharashtra Political News
क्षणात होत्याचं नव्हतं! ५७ प्रवाशांनी भरलेली धावती बस आगीच्या भक्ष्यस्थानी; १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

नगरमध्ये शरद पवार गटाला धक्का

शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला. तब्ब्ल ७ वर्षे पद सांभाळल्यानंतर पक्ष फुटीच्या वेळी शरद पवार यांच्या सोबत राहिले. त्यानंतर आता कौटुंबिक करण सांगत तडकाफडकी राजीनामा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com