संजय राठोड, यवतमाळ प्रतिनिधी
Nimish Mankar Ashish Mankar leave NCP and join Congress : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती निमीष मानकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आशिष मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. दोन्ही नेते आपल्या शकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. आगामी निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी यवतमाळमध्ये हा मोठा धक्का मानला जातोय. (Yavatmal political leaders resign from NCP before elections)
जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुका काही दिवसांवर आहेत.निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षात इनकमिंग सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून आऊट गोइंग थांबलेली नाही. त्यातच आता पांढराकवडा, राळेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा खिंडार पडणार आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती तसेच पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निमीष मानकर यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी पांढरकवडा- राळेगाव तालुक्यात काँग्रेसला अच्छे दिन आले आहे. या भागात पक्षाला बळ मिळणारा असल्याची चर्चा सुरू आहे.
मानकर गटाचे मोहदा, करंजी, रूंझा यासह पांढरा कपडा व राळेगाव तालुक्यातील भागात प्राबल्य आहे सहकार क्षेत्रातील या गटाचे वर्चस्व आहे जिल्हा परिषदेच्या गट आणि गणावर त्यांचा प्रभाव आहे निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याआधी प्रत्येक पक्षाकडून जुळवाजुळव सुरू आहे. तयारी सुरू असतानाच यवतमाळमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.