Parbhani health department saam tv
महाराष्ट्र

Parbhani health department: गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई; परभणीतील आरोग्य विभागाचे दोन प्रमुख अधिकारी निलंबित

परभणी जिल्ह्याच्या आरोग्य विभागात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ यांना निलंबित करण्यात आलंय. गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूप्रकरणी तसेच प्रशासकीय दुर्लक्षाच्या आरोपांवर विभागीय चौकशी होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

परभणी जिल्ह्याच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ उडालीये. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमवार आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ यांना एकाच दिवशी निलंबित करण्यात आलंय. कामात झालेल्या चुकीच्या कारणावरून दोन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. आरोग्य विभागाचे उपसचिव दीपक केंद्रे यांनी याबाबतचे आदेश काढलंय.

गर्भवती महिलेचा आणि बाळाचा मृत्यू

जिंतूरमध्ये सात महिन्यांची गर्भवती महिला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र तिला पुरेसे उपचार मिळाले नसल्याने महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असल्याचं नमूद करण्यात आलंय.

या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांनी देखरेख आणि प्रशासकीय जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचं निलंबन करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. निलंबनाच्या काळात त्यांचं मुख्यालय लातूरमधील मंडळ अधिकारी कार्यालय राहणार आहे.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ हे दैनंदिन कामकाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला पाठवला होता. या अहवालाच्या आधारे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात त्यांचं मुख्यालय धाराशिव राहणार आहे.

जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा कारभार पाहणारे दोन्ही प्रमुख अधिकारी एकाच दिवशी निलंबित झाल्याने आरोग्य विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील शिक्षकेत्तर भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षकेत्तर भरती बंदी उठली

Accident News : भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू

Stomach gas: सतत पोटात गॅस होतोय तर हे 4 उपाय करा; 2 मिनिटांत मिळेल आराम

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस! पुण्यासह १० जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Shiv Sena case: निवडणूक आयोगाने अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्या? शिवसेना नाव-चिन्हाच्या वादात कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तीवाद

SCROLL FOR NEXT