A private passenger bus gutted by fire on the Samruddhi Expressway near Buldhana; all passengers rescued safely. Saam tv
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अग्नीतांडव! ५२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग; आगीच्या ज्वाळा अन् किंकाळ्या...

Private Bus Caught Fire On Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर बुलढाणाजवळ धावत्या खासगी बसला भीषण आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली.

Omkar Sonawane

संजय जाधव, साम टीव्ही

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा मोठा अपघात टळता टळता वाचला. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच बसने पेट घेतला. ही घटना मेहेकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस तात्काळ थांबवण्यात आली आणि आरडाओरड करून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने रस्त्याच्या कडेला बस उभी केली. काही मिनिटांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले असले तरी काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ही खाजगी बस नागपूरहून मुंबईकडे जात होती. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक नियंत्रित करून पर्यायी मार्गाने वाहने वळवली. महत्त्वाची बाब म्हणजे, काही महिन्यांपूर्वी याच समृद्धी महामार्गावर खाजगी बसला आग लागून 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

त्या घटनेनंतरही महामार्गावरील सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप आता पुन्हा पुढे येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहनांची तांत्रिक तपासणीचा अभाव आणि आपत्कालीन यंत्रणेची अपुरी उपलब्धता यामुळेच असे अपघात घडत असल्याचे मत नागरिक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील प्रवासी वाहतूक सुरक्षित करण्यासाठी शासनाने आणि संबंधित विभागांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT