Assembly Election Rediff mail
महाराष्ट्र

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात मॅजिक! महायुती २०० पार, मविआ ५० वर अडकले; सुरुवातीचा कल आघाडीच्या विरोधात

Maharashtra Assembly Election 2024 result : सुरुवातीच्या कलानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Sabha Election Result News : सुरुवातीच्या कलानुसार, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालेय. ११ वाजेपर्यंतच्या कलामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसतेय. महायुतीचे उमेदवार सध्या २१८ जागांवर आघाडीवर आहेत. विशेषकरुन एकटा भाजप पक्ष १२८ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे मविआला जोरदार धक्का बसला आहे.

२० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल समिश्र आले होते. काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मविआ तर काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती सत्ते येईल, असा दावा केला होता. महायुतीने सर्व एक्झिट पोल फोल ठरत २१८ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये कुणीही सत्तेत आले तर १६० पर जाईल, असा अंदाज वर्तवला होता.

महायुतीची जोरदार मुसंडी -

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे. महायुतीने तब्बल २१८ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप १२८ जागांवर आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ५४ आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३५ जागांवर आघाडीवर आहे.

मविआ ५० वर अडकली -

लोकसभेला भरघोस यश मिळालेल्या महाविकास आघाडीला विधानसभेत मात्र मोठा झटका बसला आहे. महायुतीने जोरदार कमबॅक करत दोनशेचा आकडा पार केलाय. ११ वाजेपर्यंतच्या आकड्यांनुसार, मविआ फक्त ५१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २०, ठाकरेंची शिवसेना १८ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार १३ जागांवर आघाडीवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Western Railway Block : मुंबईकरांनो लक्ष असू द्या! पश्चिम रेल्वेवर रविवारी ५ तासांचा जम्बो ब्लॉक, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा |VIDEO

Maharashtra Live News Update: अजित पवार पुण्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार

Oppo Find X9: भारतात २०० एमपी कॅमेरासह 'हा' नवीन फोन होणार लाँच, कंपनीने दिली ९९ रुपयांची खास ऑफर

Samantha Ruth Prabhu: साऊथ अभिनेत्री समांथाने कथित बॉयफ्रेंडसोबतचा फोटो केला पोस्ट, फोटोंवर लाईक्सचा होतोय वर्षाव

४ नवीन वंदे भारत धावणार! PM नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील, वाचा थांबे अन् वेळापत्रक

SCROLL FOR NEXT