Assembly Election deccan Herald
महाराष्ट्र

Assembly Election: विधानसभेसाठी महायुतीचा ट्रिपल प्लान? मविआला रोखण्यासाठी 'राआंज' फॉर्म्युला?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यानंतरही भाजपला 2 अंकी जागाही जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे महायुतीने विधानसभेसाठी नवी रणनीती आखलीय. एकीकडे योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या खात्यात थेट मदत तर दुसरीकडे महाविकास आघाडीला रोखण्यासाठी नवा ट्रिपल प्लान आखलाय. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे हे तीन फॅक्टर महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे याचाच फायदा घेण्याची तयारी महायुतीनं सुरू केलीय. नेमकी काय आहे महायुतीचा हा ट्रिपल प्लान ते पाहूयात

भाजपचा ट्रिपल अॅक्शन प्लान ?

राज आणि आंबेडकरांना स्वबऴासाठी बळ, जरांगेंना उमेदवार उभं करण्यासाठी चिथावणी ?

राज ठाकरे स्वबळावर लढल्यास ठाकरे गटाच्या मतविभाजनासाठी फायदा होणार

प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढल्यास दलित मतांच्या विभाजनाचा मविआला फटका बसणार

मनोज जरांगेंनी 288 जागांवर उमेदवार दिल्यास मविआला फटका बसण्याची शक्यता

जरांगे, राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी राज्यभर दौरे करत विधानसभेची स्वबळावर चाचपणी सुरु केलीय. त्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. लोकसभा निवडणूकीत मराठा, मुस्लिम आणि दलित मतं विरोधात गेल्याने राज्यात MMD फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळेच विधानसभेला मतांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि आंबेडकरांनी स्वबळावर लढाव अशी महायुतीची रणनीती आहे. तर जरांगेंना चिथावणी देऊन सर्व मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्यासाठी महायुतीच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या MMD फॅक्टरला आपल्या बाजूने वळवण्यासाठी मविआ काय रणनीती आखणार यावर विधानसभेच्या विजयाचं गणित ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT