Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Lok Sabha: निवडणूक तोंडावर पण उमेदवार ठरेना; नाशिकमध्ये महायुतीचा गुंता सुटेना

Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभेची जागा महायुतीतील कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

Satish Daud

Nashik Lok Sabha Constituency

लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरळीत पार पडलं. आता तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज देखील भरले जात आहेत. मात्र, अद्यापही महायुतीतील काही जागांवरील तिढा कायम आहे. नाशिक लोकसभेची जागा महायुतीतील कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

नाशिक लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप या जागेवर महायुतीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. नाशिकच्या जागेवरुन महायुतीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा अधिकार असून उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा दावा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपकडून देखील नाशिकची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर अजित पवार गटाने नाशिकमधून दोन नव्या नावांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये माजी खासदार देविदास पिंगळे आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा समावेश आहे.

नाशिकची जागा आम्हालाच मिळायला हवी, आमच्याकडे ताकतीचे उमेदवार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. अजित पवार गटाच्या या नव्या प्रस्तावामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान, बंडखोरी, नाराजी आणि गोंधळ टाळण्यासाठी महायुतीकडून २ मे रोजी उमेदवारी घोषित केली जाणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे महायुतीने नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिलं आहे. त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

नाशिकमधून उमेदवारी मिळण्यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे तुळजाभवानी मातेच्या चरणी लीन झाले आहेत. ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेलाच सुटावी आणि लवकरात लवकर आपल्याला उमेदवारी जाहीर व्हावी, यासाठी तुळजाभवानी मातेला गोडसेंकडून साकडं घालण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT