PM Modi in Maharashtra Sabha Traffic Diversion
PM Modi in Maharashtra Sabha Traffic DiversionSaam TV

Narendra Modi: PM मोदींकडून प्रचारसभांचा धडाका, वाहतुकीत मोठे बदल; धाराशिव-तुळजापूर महामार्ग ६ तासांसाठी बंद

PM Modi Traffic Diversion: आजपासून पुढील तीन दिवस मोदी महाराष्ट्रातील ७ ठिकाणी जंगी सभा घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर अनेक ठिकाणच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

Narendra Modi Maharashtra Sabha

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आजपासून पुढील तीन दिवस मोदी महाराष्ट्रातील ७ ठिकाणी जंगी सभा घेणार आहेत. मोदींच्या सभेसाठी महायुतीने जोरदार तयारी केली असून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेचे कारण देत काही मार्गावरील वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे.

PM Modi in Maharashtra Sabha Traffic Diversion
Amit Shah News: देशात समान नागरी कायदा लागू करणारच; अमित शहा कडाडले, काँग्रेसला दिला इशारा

सोलापूर भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ येत्या सोमवारी (२९ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे सोलापूर विमानतळ ते होम मैदान परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

याशिवाय रंगभवन परिसर ते डफरीन चौक,पार्क चौक ते मार्केट पोलीस चौकी पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक राहणार बंद राहणार आहे. 28 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत सोलापूर जिल्ह्यात पोलिसांकडून ड्रोन बंदी घालण्यात आली आहे.

नागरिकांनी सोमवारी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी ३० एप्रिल रोजी धाराशिवमध्ये सभा घेणार आहेत.

सकाळी ११ वाजता धाराशिव-तुळजापूर रस्त्यावरील तेरणा महाविद्यालयाच्या शेजारील मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

धाराशिव-तुळजापूर महामार्ग ६ तासांसाठी बंद

धाराशिव ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत तब्बल ६ तासांसाठी बंद असणार आहे. यामध्ये पोलीस, रुग्णसेवा,अग्निशमन दलाच्या वाहने व अत्यावश्यक सेवेतील इतर वाहनांना या सूट देण्यात आली आहे. वाहनधारकांनी बेंबळी, केशेगाव या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आलंय.

पंतप्रधान मोदींची आज कोल्हापुरात सभा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरातील तपोवन मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. सायंकाळी ५ वाजता या सभेला सुरुवात होणार असून सभेसाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. सभेत मोदी नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

PM Modi in Maharashtra Sabha Traffic Diversion
Manipur News: मणिपूरमध्ये कुकी अतिरेक्यांचा CRPF बटालियनवर हल्ला; घातपातात २ जवान शहीद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com