Mahayuti News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांचा मतदारसंघ ठरला! प्रफुल पटेलांनी केली उमेदवारीची घोषणा; महायुतीचे २३५ उमेदवारही 'या' दिवशी ठरणार

Maharashtra Assembly Election 2024: प्रफुल्ल पटेल यांच्या घोषणेनंतर अजित पवार अन्य कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Gangappa Pujari

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने उत्साहित झालेल्या महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली यादी दसऱ्याला म्हणजेच 12 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. अशी घोषणा राष्ट्रवादीचे (अजित गट) कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे बारामतीमधून लढणार नाहीत, अशीही चर्चा होती. त्यावरही प्रफुल पटेल यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून बारामतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. मी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृत सांगतो की अजित पवार हे बारामतीतून उमेदवार असतील. मी पहिली जागा जाहीर करतो, असं ते म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांच्या घोषणेनंतर अजित पवार अन्य कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांच्या वाटपाबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये मॅरेथॉन बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. 235 जागांवर निवडणूक लढवण्याची चर्चा पूर्ण झाली आहे. तर उर्वरित 53 जागांवरही लवकरच निर्णय घेतला जाईल. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला जवळपास 60 ते 65 जागा मिळतील. निवडणुकीत आम्ही सन्माननीय जागा मागितल्या होत्या, त्यानुसार आम्हाला 60 ते 65 जागा मिळतील. या जागा वाटपामुळे आम्ही आनंदी आहोत, असंही प्रफुल पटेल म्हणाले.

हरियाणा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रातील नेत्यांना त्यांच्या राजकीय पावलावर पुनर्विचार करण्यास भाग पाडतील. हरियाणात भाजपची हॅटट्रिक आणि जम्मू-काश्मीरमध्ये चांगली कामगिरी मोदी सरकारची गेल्या दहा वर्षातील कामगिरी दर्शवते. शेतकऱ्यांचे आंदोलन, विशिष्ट जाती आणि खेळाडूंमधील अशांतता यासह अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी हरियाणा निवडणुकीत भाजप हरणार असल्याचे खोटे कथन माध्यमांद्वारे तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. 'हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निकालांनी महायुती उत्साहित आहे. लोकसभा निवडणुकीत खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या, असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT