Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule addressing party workers on corporation appointments  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

No Immediate Corporation Appointments: महायुती सरकारने महामंडळावर नियुक्तीसाठी निकष ठरवलेत. आता महामंडळावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची वर्णी लागणार? आणि त्यासाठीचे पात्रता निकष काय आहेत?

Omkar Sonawane

मलईदार महामंडळाकडे डोळे लावून बसलेल्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडलीय.. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच महामंडळावर नियुक्त्या करण्यात येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपच्या मेळाव्यात स्पष्ट केलंय... त्यामुळे इच्छुकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडलीय....

निवडणूक जिंका, महामंडळ मिळवा !

महामंडळावरील नियुक्त्या निवडणुकीनंतरच होणार, बावनकुळेंची माहिती

'जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका तुम्ही पक्षाला जिंकून दाखवा'

नियुक्त्या निवडणुकीनंतर करण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याचं बावनकुळेंनी सांगितलं

महत्त्वाच्या 140 महामंडळांवर भाजपच्या 785 नेते, कार्यकर्त्यांची नियुक्ती करणार

खरंतर महामंडळाच्या वाटपासाठी शंभुराज देसाई, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ यांच्यात बैठक झाली.. या बैठकीत 60 टक्के महामंडळाचं वाटप निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच महामंडळाचं वाटप करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय...याच मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी पक्षाविरोधात काम करणाऱ्यांनाही कठोर इशारा दिलाय...

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीत अनेकजण महामंडळासाठी इच्छुक होते.. त्यातच तीन्ही पक्षाच्या बैठकीत भाजपला 44, शिंदे सेनेला 33 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळं देण्याची चर्चा झाली.. मात्र आता भाजपने महामंडळ वाटप निवडणुकीनंतर करण्याचं जाहीर केल्याने जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणाऱ्यांना मलाईदार महामंडळ मिळणार की आमदारकी हुकलेल्यांना? याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनपासून 3 राशींची होणार चांदीच चांदी; शनी-मंगळ बनवणार पॉवरफुल योग

Success Story: संघर्षाच्या काळात गर्लफ्रेंडने दिली साथ; कोणत्याही कोचिंगशिवाय क्रॅक केली JPSC; अमन कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

ladki bahin yojana : अपात्र महिला आणि बोगस भावांना दणका; अपात्र लाडक्यांकडून पैसे वसूल करणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

Thursday Horoscope : आयुष्याच्या वळणावर आव्हाने स्वीकारावे लागणार; 'या' राशींच्या लोकांना जवळच्याच व्यक्तींकडून विरोध होईल

Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल, प्रज्ञासिंहसोबत सातही आरोपींचं काय होणार?

SCROLL FOR NEXT