Maharashtra Vidhan Parishad Election 2024:  Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: 'जळगावमध्ये CM शिंदेंच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप', सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप; VIDEO केला शेअर

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले असून काल त्यांनी किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या. यावेळी पैसे वाटण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Gangappa Pujari

लोकसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले असून काल त्यांनी किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या. अशातच मुख्यमंत्री शिंदेच्या जळगावमधील बैठकांनंतर पैसे वाटप झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

काय म्हणाल्यात सुषमा अंंधारे?

"महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले," असा खळबळजनक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच अंधारेंनी एक व्हिडिओ देखील ट्वीट केला असून कुठाय निवडणूक आयोग? असा सवाल उपस्थित केला आहे.

यावरुनच खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. "सुषमा अंधारे यांनी त्याबाबतचा व्हिडीओ दिला. हा व्यभिचार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. पदवीधर शिक्षक वर्गाला या बाजारात ओढू नका. लोकशाहीची हत्या होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे पाहत आहे," असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सुषमा अंधारे यांना काही काम नाही. पोलिंग एजेंटला याद्या द्यायच्या असतात. त्या याद्यांबरोबर पैसे ही दिले जातात. यादी बरोबर खर्चाला 500 रुपये दिले जातात. ही निवडणुकीची प्रक्रिया आहे आणि सर्वांना ही माहितीच आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधींचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT