konkan Politics Saam tv
महाराष्ट्र

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

konkan Politics : कोकणात विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं ठाकरेंचा एक उमेदवार फोडलाय... मात्र कोकणात मविआची ताकद कशी कमी झालीय आणि राज्याच्या राजकारणात मविआच्या उमेदवारी कसा माघारीचा पॅटर्न सुरु केलाय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Snehil Shivaji

राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणूकीनं राज्याच्या राजकारणाला असे हादरे आणि धक्के दिले की, ज्याने निवडणूक पद्धतीवरचा विश्वासच उडावा असंच चित्र निर्माण झालंय. याचा सर्वात धक्कादायक चित्र कोकणात पाहायला मिळालं. कालपर्यंत जोषात निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी थेट नितेश राणेंसोबत जात निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. बाळ मानेंनी आपला निर्णय जाहीर करताच मुंबईतल्या मातोश्रीला देखिल धक्का बसला. महायुतीनं जागा राष्ट्रवादीला सोडली होती. मात्र ठाकरेंच्या उमेदवारानं माघार घ्यावी यासाठी ठाकरेंचे कट्टर विरोधक मंत्री नितेश राणेच मैदाना उतरले. मात्र उदय सांमतांच्या एका वक्तव्यानं माघार घेतलेल्या बाळ मानेंच्या दाव्याचीही हवा निघालीये.

कधीकाळी शिवसेनेचा गड असलेल्या कोकणात सध्या ठाकरेंकडे एकमेव आमदार आणि एकही खासदार नाही आणि नगरसेवकांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. त्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत थेट उमेदवारच फोडून ठाकरेंना मोठा सेटबॅक देण्यात महायुतीला यश आलंय. परंतू फक्त कोकणातच नाही तर राज्यभरात महाविकास आघाडीनं अक्षरशा शरणागती पत्करल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी उमेदवारच दिला नाही तर अनेक ठिकाणी ऐनवेळी माघार घेतली. कुठेकुठे मविआनं शरणागती पत्करली ते पाहूया.

विधान परिषदेत मविआची शरणागती

रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड

ठाकरेसेनेच्या बाळा मानेंची अचानक माघार

ठाणे

राष्ट्रवादी(SP)चे उमेदवार अभिजीत पवारांची माघार

पुणे

राष्ट्रवादी(SP)च्या श्रीकांत पाटलांची माघार

यवतमाळ

काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळेंची माघार

वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर

काँग्रेसच्या शैलेश अग्रवालांची माघार

अहिल्यानगर

2 इच्छुक उमेदवार असूनही काँग्रेसनं AB फॉर्म दिला नाही

छत्रपती संभाजीनगर

ठाकरेसेनेच्या देवयानी डोणगावकर यांची अखेरच्या क्षणी माघार

विधानपरिषदेच्या या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर ठाकरे गटानं संताप व्यक्त करत निवडणूक व्यवस्थेवरच सवाल उपस्थित केलेत.

लोकशाहीत निवडणूक हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. कुठलीही निवडणूक ही पारदर्शक वातावरणात पार पडली की लोकशाहीचा जागर होतो. मात्र महापालिका निवडणूकांपासून उमेदवार फोडून बिनविरोध निवडणूका करण्याचा सुरु झालेला हा ट्रेन्ड लोकशाहीच्या सशक्तीकरणाच्या धोरणाला बट्टा लावतोय. महाराष्ट्रात सुरू झालेल्या य़ा माघारीच्या पॅटर्नमुळे लोकशाहीसोबतच तडजोड सुरू झाल्याची चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates :अपात्रतेचा निर्णय आधी, मगच पक्ष कोणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे पुन्हा आक्रमक; जरांगेंना थेट माफी मागण्याचं आव्हान

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT