अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळा विस्ताराला आज मुहूर्त लागला. नागपूरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. नव्या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. भाजपकडून नव्या मंत्रिमंडळात तब्बल 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आलीय. या मंत्र्यांची आतापर्यंतची काय-काय कारकीर्द राहिलीय हे जाणून घेऊ.
भाजप आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. नितेश राणे या मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत. भाजपचे तरुण आक्रमक नेते म्हणून ते समोर येत आहेत. नितेश राणे हिंदुत्त्व मुद्द्यावरून आक्रमपणे भाषण करतात. विविध सामाजिक कार्य, मतदारसंघातील कामे आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्याची त्याची शैलीमुळे पक्ष खूश असल्याचं म्हटलं जात आहे.
ह्या परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या आमदार आहेत. त्या दोनवेळा येथून निवडणून आल्या आहेत. मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांनी मतदारसंघातून पाचवेळा आमदारकी भुषवलीय. बोर्डीकर आधी काँग्रेसमध्ये होते. पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांची कन्या मेघना बोर्डीकर यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आमदार झाल्या आहेत.
ही त्यांची दुसरी टर्म आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या जिंतूर, परभणी येथून निवडून आल्या. मेघना बोर्डीकर यांनी 3,717 मतांच्या फरकाने राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांचा पराभव केला. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्या जिंतूर, विधानसभेत दुसऱ्यांदा निवडून आल्या.
परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्या असताना त्यांनी त्यांनी शेतकऱ्यांसाठी कामे केली आहेत. त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी खतांचा साठा राखण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. जलक्षेत्रातील सुधारणा, शाश्वत सिंचन, खते आणि बियाणे वितरण यासारख्या महत्त्वाच्या कृषी विकास उपक्रमांसाठी त्या राज्य संसाधनांचे निर्देशही करतात. मेघना बोर्डीकर यांनी दीपस्तंभमधून आपल्या कामाची सुरुवात केली. त्या लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्या गावोगावत राहिल्या.
माधुरी मिसाळ पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 2009 पासून त्या या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. पर्वती मतदारसंघातून त्या सलग ४ वेळा निवडून आल्या आहेत. कामांमुळे भाजप पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिलीय. २० वर्षांपासून मिसाळ यांनी पुण्यात भाजप वाढवण्यासाठी काम केले. नगरसेविका ते आमदार आणि आता त्या मंत्री झाल्या आहेत.
पुण्याच्या सामाजिक-राजकीय आणि पायाभूत सुविधांमध्ये माधुरी मिसाळ यांचं मोलाचं योगदान आहे. कसबा मतदारसंघातून २००७ मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
शिवेंद्रराजे भोसले हे 2019 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांची साताऱ्यात मोठी ताकद आहे. त्यांना यावेळी भाजप पक्षाने मंत्रिपदाची संधी दिलीय.
भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे महायुती सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री होत आहेत. गणेश नाईक 2004 पासून आमदार म्हणून सलग पाचव्यांदा निवडून आलेत. गणेश नाईक यांची नवी मुंबईतील राजकीय वर्चस्व पाहता पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिलीय. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेत.
1) 2007 जिल्हा परिषद सदस्य आंधळी गट नियोजन समिती सदस्य
2) 2009 ला आमदार विधानसभा सदस्य ( अपक्ष )
३) 2014 ला आमदार विधानसभा सदस्य ( कॉंग्रेस )
४) 2019 ला आमदार विधानसभा सदस्य ( भाजप )
5) 2022 सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्षपद
6) 2024 आमदार ( भाजप )
7 ) 2024 मंत्री महाराष्ट्र राज्य.
शिवेंद्रराजे भोसले हे 2019 मध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांची साताऱ्यात मोठी ताकद आहे. त्यांना यावेळी भाजप पक्षाने मंत्रिपदाची संधी दिलीय.
पंकज भोयरे हे सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडणून आलेत. वर्धा मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. पक्षाने आता त्यांना मंत्रिपदाची संधी दिलीय.
अशोक उईके राळेगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. ते 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकांमध्ये सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यामुळे पक्षाने त्यांना मंत्रिपदाची संधी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.