महावितरणची 'लकी डिजिटल ग्राहक योजना'; ऑनलाइन वीजबील ऑनलाईन भरा अन् स्मार्टफोन जिंका Google
महाराष्ट्र

Mahavitaran : महावितरणची भन्नाट ऑफर, ऑनलाइन बिल भरा अन् स्मार्टफोन जिंका

Lucky Digital Customer: महावितरणने 'लकी डिजिटल ग्राहक योजना' सुरू केली असून, ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या लघुदाब गटातील ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच जिंकण्याची संधी आणि बिलावर ०.२५% सूट मिळवण्याचा फायदा मिळेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी 'लकी डिजिटल ग्राहक योजना' सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत, जर तुम्ही ऑनलाइन वीजबील भरले, तर तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्टवॉच यासारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. ही योजना जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीत लागू आहे. त्यामुळे, वीज बिल भरण्याच्या पारंपारिक पद्धतीला सोडून, ऑनलाइन माध्यमांचा वापर करा आणि लकी कस्टमर योजना अंतर्गत बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा.

महावितरणने जाहीर केलेल्या 'लकी डिजीटल ग्राहक' योजना अंतर्गत लघुदाब गटातील ग्राहक ज्या ग्राहकांनी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज बिल भरलेले नाही, ऑनलाईन वीज देयक भरलेले नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरण्याचा पर्याय वापरलेला नाही, अशा ग्राहकांना ही योजना लागू होईल. फक्त लघुदाब गटातील ग्राहक (ज्यांनी वरील कालावधीत ऑनलाईन वीज बिल भरलेले नाही). सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक, पथदिवे ग्राहक, फ्रँचायझी क्षेत्रातील ग्राहक यांना यातून वगळण्यात आले आहे. महावितरणने जास्तीत जास्त पात्र ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच बक्षीस

महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे आणि जून २०२५ या महिन्यांमध्ये प्रत्येकी तीन ऑनलाईन सोडती काढण्यात येणार आहेत. प्रत्येक सोडतीत ५ विजेते निवडले जातील आणि त्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत.

वेळेसह पैशांची बचत

महावितरणकडून वीज ग्राहकांना डिजीटल पद्धतीने वीजबील भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. रांगेत उभे राहण्याच्या त्रासापेक्षा ग्राहकांना वेळ, श्रम आणि पैशांची बचत व्हावी, यासाठी महावितरणने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून वीजबील भरू शकतात. डिजीटल पद्धतीने वीजबील भरणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेवर ०.२५ टक्के सूट मिळते. राज्यात सध्या ७०% हून अधिक ग्राहक ऑनलाईन वीजबील भरत आहेत, यामुळे वीजबील भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद झाली आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT