NCP Sharad Pawar News
NCP Sharad Pawar News  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar : मोठी बातमी! मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच सांगू शकत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

साम टिव्ही ब्युरो

Political News : आगामी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणात लवकरच दोन मोठे भूकंप होणार असल्याचं म्हटलं होतं. अशात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही हे अताच सांगता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. (Maha Vikas Aghadi)

एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेले काही दिवस अजित पवार आपल्या वेगळ्या गटासह भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र या सर्व चर्चांवर अजित पवारांनी स्वत: माध्यमांसमोर येत पडदा टाकला आहे.

दरम्यान, अमरावतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांना 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? असं मोठं विधान केलं आहे. शरद पवारांनी केलेलं हे वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटाला एक इशारा आहे अशीही चर्चा आता सुरू झालीये.

काय म्हणाले शरद पवार?

2024 च्या निवडणुका वंचित बहुजन आघाडीसोबत मविआ एकत्र लढेल का? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी म्हटलं की, "वंचितची आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती फक्त कर्नाटकातल्या मर्यातीद जागांविषयी होती. दुसरी कसलीही नव्हाती, मविआ आणि वंचित बाबात शदर पवारांनी असं म्हटलं आहे.

तसेच,मविआबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, "आम्ही एकत्र लढणार वगैरे आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यामध्ये काही इश्यू आहेत. त्यामुळे हे अजून ठरलेलं नाही तर पुढचं कसं सांगता येईल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? असं विधान शरद पवार यांनी केलं आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Today's Marathi News Live: गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण; गुंड गजानन मारणेचा व्हिडिओ व्हायरल

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT