Prashant Phule Comment On Udayanraje Bhosale Statement 
महाराष्ट्र

Girls School Controversy: महात्मा फुले यांनीच सुरू केली मुलींची शाळा; प्रशांत फुलेंनी उदयनराजेंचा 'तो' दावा खोडला

Prashant Phule Comment On Udayanraje Bhosale Statement: महात्मा फुले यांनी १८४८मध्ये मुलींची शाळा सुरू केली होती. फुलेंनी पुणे, सातारा, अहिल्यानगर येथे तब्बल १८ शाळा सुरू केल्या होत्या.

Bharat Jadhav

मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह राजे भोसले यांनी सुरू केली. महात्मा फुले यांनी त्यांचे अनुकरण केलं, असा दावा उदयनराजे भोसले यांनी केला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचं म्हणत प्रशांत फुले यांनी थेट पुरावे सादर करत उदयनराजे यांची चूक निर्दशनात आणून दिली. महात्मा फुलेंनी १८४८ मध्ये मुलींची शाळा काढली होती. तर १८५१ मध्ये बांधण्यात आलेल्या साताऱ्यातील राजवाड्यात 'सातारा हायस्कूल' सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशांत फुले यांनी दिलीय.

खासदार उदयनराजे भोसले यांचा दावा खोडून काढण्यासाठी प्रशांत फुले यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचा संदर्भ दिलाय. या वृत्तानुसार, प्रतापसिंह महाराज यांनी १८२४ मध्ये साताऱ्यात राजवाडा बांधला होता. या राजवाड्यात १८५१ मध्ये सातारा हायस्कूल सुरू करण्यात आलं. या हायस्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०४ रोजी 'भिवा रामजी आंबेडकर' या नावाने प्रवेश घेतला होता.

तर १९५१ मध्ये शतक महोत्सवात शाळेचे नाव 'छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल' करण्यात आले. तर महात्मा फुले यांनी १ जानेवारी १८४८ साली मुलींची शाळा काढली होती. महात्मा फुलेंनी पुणे, सातारा, अहिल्यानगर या शहरात १८ शाळा सुरू केल्या. त्याआधी शूद्र-अति शू्द्र मुलींसाठी शाळा नव्हत्या. महात्मा फुले यांच्यानंतर १८५१ साली प्रतापसिंह महाराज यांनी सर्व मुलं-मुलींसाठी शाळा सुरू केली.

थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली मुलींची पहिली शाळा - उदयनराजे भोसले

थोरले प्रतापसिंह महाराज यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण महात्मा फुलेंनी केलं. त्यानंतर त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. त्यामुळे स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरू केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज. महाराजांनी स्वत:च्या राजवाड्यात शाळा सुरू केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालं. असं विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं होतं.

त्यांच्या विधानानंतर वाद रंगला होता. खासदार भोसले यांच्या वक्तव्याचा ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी समाचार घेतला. उदयनराजे भोसले यांनी फुलेंच महत्व कमी केलं आणि त्यांच्या पूर्वजांच महत्व वाढवण्यांचे काम केलं असं ससाणे म्हणाले. आता प्रशांत फुले यांनीही वृत्तपत्राच्या लिंक प्रसारित करत खासदार उदयनराजे भोसलेंचा दावा खोडून काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT