Uddhav and Raj Thackeray Join Hands to Oppose Hindi saam tv
महाराष्ट्र

Uddhav and Raj Thackeray Yuti: हिंदीसक्तीमुळे भावांमधील राजकीय वैर संपलं; 20 वर्षानंतर राज-उद्धव ठाकरे येणार एकत्र

Uddhav and Raj Thackeray Join Hands to Oppose Hindi Imposition: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ जवळपास २० वर्षानंतर एकत्र येणार आहेत.

Bharat Jadhav

महाराष्ट्रातील राजकारणात ठाकरे हे नावाचं मोठं वलय आहे. राजकीय मतभेदामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी वेगवेगळे मार्ग निवडले. त्यातून दोन्ही भावांमधील राजकीय वैर वाढत गेलं. पण आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण ठरलंय सरकारने घेतलेला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय.

मुंबई आणि राज्यातील राजकारणात राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू मोठं व्यक्तीमत्त्व. राज्यातील राजकारण दोन्ही नावाने पूर्ण होत नाही. सरकार बनवणं असो किंवा कुठल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी असो, या दोन्ही भावांची सहमती असणं आवश्यक असतं. राजकीय मतभेदामुळे दूर झालेले ठाकरे बंधू सरकारच्या निर्णयामुळे एकत्र येणार आहेत. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील राजकारण तापलंय.

या निर्णयाविरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. पहिली इयत्तेपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात यावी, असा निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतलाय. याचा विरोध मराठी माणसाच्या हितासाठी लढणारे ठाकरे गट आणि मनसेकडून करण्यात येत आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळा विरोध सुरू केला होता. परंतु त्या दोघांनी एकच मोर्चा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतलाय.

दोन्ही नेते आधी वेगवेगळे निषेध करणार होते. राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी रॅलीची घोषणा केली होती, तर उद्धव ठाकरे यांनी ७ जुलै रोजी रॅलीची घोषणा केली होती. दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, आम्ही हिंदीच्या विरोधात नाही, पण सक्तीने हिंदी शिकवण्याचा हट्टहास चांगला नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही वेगवेगळा मोर्चा काढणार होते.

परंतु आता दोघांनी एकत्र येत एकच मोर्चा काढण्याचं ठरवलंय. ५ जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान मराठी भाषेसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चेत दोन्ही बंधू २० वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत. हा हिंदी सक्तीच्या निर्णायामुळे दोन्ही भावातील वैर संपलं असून ते युती करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

युतीची चर्चा

गेल्या काही दिवासांपासून राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत दोन्ही भावांकडून सकारात्मक संकेत देण्यात आली आहेत. याबाबत संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय. मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात असं म्हटलंय. तर या मोर्चेसाठी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एक आठवड्यापासून भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

दरम्यान एकाबाजुला युतीच्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षाचे दोन महत्त्वाचे नेते म्हणजेच संदीप देशपांडे आणि ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. ही भेट युतीची नांदी असल्याचे म्हटलं जात आहे.

२००६ मध्ये राज ठाकरेंनी सोडली होती शिवसेना

हिंदी सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चेबाबत संजय राऊत म्हणाले, रॅलीचे ठिकाण आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. संजय राऊत म्हणाले की, शिवसेना-ठाकरे गट आणि मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) चे नेते रॅलीमध्ये उपस्थित राहतील. रॅली कुठे होईल आणि वेळ काय असेल यावर चर्चा सुरू आहे. या घोषणेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे २० वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र दिसू शकतात. २००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळे होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sudden death in sleep: झोपेत अचानक मृत्यू होण्यामागची कारणं कोणती? धोका टाळण्यासाठी शरीरातील 'हे' बदल नक्की ओळखा

Kumbha Rashi: कुंभ राशीच्या व्यक्तींचा दिवस कसा असेल? प्रेमात खटके, पण समाजात मिळेल नवी ओळख; वाचा राशीभविष्य

Blouse Back Neck Design: ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे डिझाईन्स, तुमचा लूक दिसेल आकर्षक

Dharashiv Flood: धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार, भीषण पूरस्थिती; मात्र जिल्हाधिकारी डान्स करण्यात दंग; पाहा VIDEO

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT