Tomato Price decreses Saam tv
महाराष्ट्र

Tomato Price News : आता भाजीत हवा तेवढा टोमॅटो टाका; भाव निम्म्याहून घसरले, वाचा आजचे दर

Satish Daud

Tomato market price in Maharashtra : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोमॅटोचे (Tomato)दर गगनाला भिडले होते. मात्र, आता दरात मोठी घसरण झाली आहे. अनेक जिल्ह्यात टोमॅटोचा भाव प्रतिकिलो 50 रुपयांच्या खाली आला आहे.

बुधवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या घाऊक बाजारपेठेत टोमॅटो 50 रुपयांना 2 किलो अशा दराने मिळत आहेत. त्यामुळे टोमॅटो खरेदी करण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या आठवड्यात याच बाजारात टोमॅटोला प्रति किलो 130 ते 140 रुपये इतका भाव मिळत होता.

मात्र, आठवड्याभरातच सिल्लोड बाजारपेठेत टोमॅटोचे दर झपाट्याने उतरले असून भाव निम्म्याहून कमी झाले आहे. एकीकडे टोमॅटोचे भाव घसरल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

टोमॅटोचे भाव का वाढले?

दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात टोमॅटोची लागवड कमी झाली होती. त्याचबरोबर राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे टोमॅटो पाण्याअभावी करपून गेली होती.

परिणामी टोमॅटोचे उत्पादन कमी आणि बाजारपेठेत मागणी जास्त वाढल्याने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात टोमॅटोचे भाव वधारले. 20 ते 30 रुपये प्रतिकिलो अशा दराने मिळणारा टोमॅटो 200 रुपयांच्या घरात गेला.

टोमॅटोचे भाव का घसरत आहेत?

जुलै महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच टोमॅटोला भाव मिळत असल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टोमॅटोची लागवड केली. त्याचबरोबर बाजारपेठेत नव्या मालाची आवक सुरू झाल्याने टोमॅटोचे भाव झपाट्याने खाली आले आहेत.

मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली असल्याने बाजारपेठेत नव्या टोमॅटोची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव घसरत आहेत. येत्या महिनाभरात घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव 15 ते 20 प्रतिकिलोवर आला, तर नवल वाटायला नको.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT