Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसला मासिक पासची सुविधा करा; रेल्वे प्रवासी संघाकडून मागणी

Maval News: वंदे भारत एक्सप्रेसला मासिक पासची सुविधा करा; रेल्वे प्रवासी संघाकडून मागणी
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressSaam tv

मावळ : पुणे- मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला योग्य दरात मासिक पास सुविधा सुरु केल्यास प्रवाशांची संख्या वाढेल. तसेच पुणे-मुंबई (Mumbai) दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे मासिक पास सुविधा सुरु करण्यात (Maval) यावी अशी मागणी होऊ लागली आहे. (Latest Marathi News)

Vande Bharat Express
Maharashtra Political News : शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्रिपद मिळणार? विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

मध्य रेल्वेच्या पुणे- मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससह देशातील अन्य वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा कमी प्रतिसाद लाभत आहे. सुमारे ४० टक्क्यांहून अधिक सीट रिकाम्या राहत असल्याचे निदर्शनास येते. या महत्वाकांक्षी एक्सप्रेसचा प्रवास आरामदायक व सुविधायुक्त असला तरी तिचे तिकिट दर (Pune) अन्य एक्सप्रेस व सुपरफास्टच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. 

Vande Bharat Express
Earthquake In Satara, Sangli, Kolhapur : पाटणसह सांगली काेल्हापूरला भूकंपाचा धक्का, काेयना धरण सुरक्षित

वंदे भारत एक्सप्रेसचा वेग देखील अन्य रेल्वे इतकाच असल्याने वेळेत देखील फारशी बचत होत नाही. या कारणांमुळे आता प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. परिणामी वंदे भारत एक्सप्रेस तोट्यात जाण्याची चिंता रेल्वे प्रशासनाला सतावत आहे. रेल्वे प्रशासन देशातील सर्वच वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट दर कमी करण्याचा विचार करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com