AHARASHTRA POTHOLE CRISIS: BHIWANDI HERO JAWAN DIES, ROAD SAFETY UNDER QUESTION saam tv
महाराष्ट्र

भिवंडीत देवदूत ठरलेल्या जवानाचा खड्ड्यांमुळे मृत्यू,राज्यातील रस्त्यांना खड्ड्यांचा विळखा

Bhiwandi Jawan Died Due To Pothole: आपलं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी निघालेल्या महिलेचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीव गेलाय. इतकंच नव्हे तर याच खड्ड्यांमुळे भिंवडीतील इमारत दुर्घटनेत देवदूत ठरलेल्या जवानालाही प्राण गमवावे लागलेत. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्था आणखी किती कुटुंब उद्ध्वस्त होऊ देणारेय, हाच खरा सवालये,पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

Rohit Kadam

  • महाराष्ट्रातील खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढतंय.

  • भिवंडीतील देवदूत ठरलेल्या जवानाचा आणि एका महिलेचा खड्ड्यांमुळे जीव गेला.

  • रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह

राज्यातील विविध ठिकाणी रस्त्यांची चाळण झालीये. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकही आमनेसामने आले आहेत. मात्र, या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांचे बळी जाण्याची मालिका काही केल्या थांबत नाहीये. नुकत्याच झालेल्या भिवंडी इमारत दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवणारे जिगरबाज TDRF जवान विकास लहू गोरे यांचा खड्ड्यांमुळे बळी गेलाय. शहापूरमधील भारंगी नदीच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात बुलेट आदळल्यानं झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

मात्र, उपचारादरम्यानच विकास गोरेंचा मृत्यू झाला. विकास गोरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासकीय अनास्थेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. तर दुसरीकडे, या परिसरातल्या ठाणे-भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका 46 वर्षीय महिलेचाही मृत्यू झालाय. नव्या घराचं स्वप्न उराशी बाळगून फ्लॅट पाहण्यासाठी सुनिता अक्षयलाल पाल आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात होती.

मात्र खड्ड्यात दुचाकी घसरली आणि सुनिता पाल रत्यावर पडल्या. मात्र मागून अचानक आलेल्या ट्रकनं त्यांना चिरडलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले. या घटनांमुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय. खड्डे बुजवण्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडवरून विरोधकांनी गंभीर आरोप केलेत.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीये. एका TDRF जवानाच्या मृत्यूमुळे राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा पश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे जवानांसह सर्वसामान्यांचा बळी जात असल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळलीये. महामार्गावरील मोठंमोठे खड्डे नागरिकांचे जीव घेत असताना नेते मात्र एकमेकांना दूषणं देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा महामार्गांवरील जीवघेण्या खड्ड्यांतून होणारा प्रवास नेमका थांबणार तरी कधी?, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT