India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Shreya Maskar

जयपूर

जयपूरमधील 'जल महाल' हे जयपूर शहराच्या मुख्य केंद्रापासून उत्तरेकडे सुमारे ४ किलोमीटर अंतरावर, जयपूर-आमेर मुख्य मार्गावरील 'मान सागर' सरोवराच्या मध्यभागी वसलेले आहे.

Jaipur | google

जल महाल

अद्वितीय वास्तुशैली आणि निसर्गरम्य पार्श्वभूमीमुळे मान सागर सरोवराच्या मध्यभागी तरंगत असल्यासारखा भास निर्माण करणारा जयपूरमधील 'जलमहाल' अत्यंत प्रसिद्ध आहे.

Jal Mahal | google

तरंगल्याचा भास

ही ५ मजली इमारत असून तिचे चार मजले पाण्याखाली आहेत; त्यामुळे केवळ सर्वात वरचा मजलाच पाण्यावर दिसतो. विशेष चुनखडीच्या मिश्रणामुळे पाण्याखालील मजल्यांमध्ये पाणी झिरपण्यापासून रोखले जाते. जल महाल पाण्यावर तरंगल्याचा भास होतो.

Floating | google

अद्वितीय वास्तुशैली

जल महालात राजपूत आणि मुघल शैलींचा संगम दिसून येतो. यात गुलाबी वाळूच्या दगडांच्या भिंती, सममितीय घुमट आणि नक्षीदार झरोके यांचा समावेश आहे.

Unique architecture | google

हिरवागार निसर्ग

अरवली पर्वतरांगांनी वेढलेल्या या ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. परिसरातील मान सागर सरोवर हे विविध स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान आहे.

Green nature | google

महाल कधी बांधला?

जयपूरमधील जलमहालची मूळ बांधणी साधारणपणे १६९९ मध्ये झाली होती आणि नंतर १८ व्या शतकात महाराज माधो सिंग प्रथम यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार, नूतनीकरण केले.

When was the palace built? | google

ऐतिहासिक महत्त्व

जयपूरमधील जल महाल हा १८ व्या शतकातील एक अद्वितीय 'जल-प्रासाद' (पाण्यातील महाल) आहे.राजघराण्यातील व्यक्तींच्या विरंगुळ्याचे ठिकाण आणि राजपूत-मुघल अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

Historical significance | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : धुकं, हिरवागार निसर्ग अन् फेसाळलेले धबधबे; पावसाळ्यात कर्जतची सफर ठरते खास, फिरा 'ही' ठिकाणे

Karjat Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...