Karjat Tourism : धुकं, हिरवागार निसर्ग अन् फेसाळलेले धबधबे; पावसाळ्यात कर्जतची सफर ठरते खास, फिरा 'ही' ठिकाणे

Shreya Maskar

भिवपुरी धबधबा

भिवपुरी धबधबा २० फूट उंचीचा आहे. उंच कड्यावरून खाली कोसळणारा हा धबधबा पाहून मन भारावून जाईल.

Bhivpuri Falls | google

कोंडाणा लेणी

खडकात कोरलेल्या या प्राचीन बौद्ध लेण्या दाट झाडीमध्ये वसलेल्या आहेत. कोंडाणा लेणी वास्तु आणि शिल्पकलेचा सुंदर नजारा आहे.

Kondana Caves | google

पेठ किल्ला

पेठ किल्ल्याला कोथळीगड असेही म्हणतात. हे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दिमाखात उभा आहे आणि येथून दरीची विहंगम दृश्ये दिसतात.

Peth Fort | google

उल्हास दरी

पावसाळ्यात ही सुंदर दरी अनेक लहान ओढे आणि धुक्याने भरून जाते. निसर्ग फोटोशूट, निवांत फेरफटका आणि टेकड्यांनी वेढलेल्या परिसरात कुटुंबासोबत शांत पिकनिकसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

Ulhas Dari | google

झेनिथ धबधबा

खोपोलीजवळ असलेला झेनिथ धबधबा पावसाळी ट्रिपसाठी बेस्ट आहे. येथे पाण्याचा जोरदार प्रवाह पाहायला मिळतो. स्थानिक टेकड्यांमधून जाणाऱ्या छोट्या वाटेने तुम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता.

Zenith Falls | google

सोंडाई किल्ला

तुम्हाला पावसाळ्यात पहिल्यांदाच ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर सोंडाई किल्ल्याला नक्की भेट द्या. किल्ल्याच्या माथ्यावरून जवळच असलेल्या मोरबे धरण आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते.

Sondai Fort | google

मोरबे धरण

मोरबे धरण हे मोठे जलाशय शहराच्या गोंगाटापासून दूर शांत निसर्गरम्य ठिकाण आहे. पाण्याकाठी बसून दुपारचा निवांत वेळ घालवण्यासाठी येथे नक्की जा.

Morbe Dam | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सापांना घाबरत नाहीत इथले लोक! भारतातील 'या' गावाचं रहस्य काय?

India | AI PHOTO
येथे क्लिक करा...