Ladaki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळी भेट; E-KYC करणाऱ्यांना हप्ता मिळाला की नाही?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्त बँक खात्यात जमा. ई केवायली प्रक्रियेला वेग. त्यांच्याही खात्यात पैसे जमा.

Bhagyashree Kamble

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट.

  • सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा.

  • ई केवायसी न करणाऱ्यांनाही मिळाला हप्ता.

राज्यात सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात खटाखट जमा होण्यास सुरूवात झाली. दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा झाली. राज्यातील काही भागातील अतिवृष्टी आणि आस्मानी संकटामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या राज्य सरकारने प्रत्येक लाभार्थी महिलेला ई - केवायसी बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे. ज्यांनी अद्याप ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनाही सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. दरवर्षी लाडक्या बहिणीला ई - केवायसी करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटी महिलांनी ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी २ महिन्यांत ई - केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

आपण ई - केवायसीची प्रक्रिया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिक वेबसाईटवर जाऊन पूर्ण करू शकता. सरकारच्या काही फेक वेबसाईट समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या वेबसाईटवरून ई केवायसी केली, तर कदाचित तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे ई केवायसी करताना काळजीपूर्वक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.

तर, काही ठिकाणी ई केवायसी पूर्ण करताना लाडक्या बहिणींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही जणांना ई केवायसी करताना त्वरीत ओटीपी मोबाईलमध्ये प्राप्त होत नाही. त्यामुळे पुढची प्रक्रिया लवकर होत नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना ई केवायसी करताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई केवायसी करताना वडील किंवा पतीचे आधार नंबर अनिवार्य आहे. मात्र, दोन्ही हयात नसतील तर कुणाचा आधार नंबर वापरावा? असा प्रश्न काही लाडक्या बहिणींना निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ...म्हणून उद्धव ठाकरे हंबरडा फोडतायेत, त्यांना कुणी चारा टाकणार नाही, भाजप नेत्याचा टोमणा

Sonali Kulkarni: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणी चांद तुझ्या डोळ्यांत... सोनालीचं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव मोडमध्ये

बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा ताफा, नेमके काय घडले? पाहा VIDEO

Vidula Chougule: 'जीव झाला येडापिसा' फेम अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट

SCROLL FOR NEXT