पुण्यात राजकीय भूकंप! अजितदादांचा काँग्रेसला झटका, बड्या महिला नेत्यासह संपूर्ण कुटुंबाची राष्ट्रवादीत एन्ट्री

Ajit Pawar Gains Strength in Pune: पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या माजी नगरसेविका शेट्टी कुटुंबाने राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Ajit Pawar Gains Strength in Pune
Ajit Pawar Gains Strength in PuneSaam
Published On
Summary
  • पुण्यात अजित पवारांची ताकद वाढली.

  • काँग्रेसला खिंडार.

  • शेट्टी कुटुंबाचा राष्ट्रावादीत प्रवेश.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना राजकीय वर्तुळात उलथापालथ पहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद वाढण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही पुण्यात जम बसवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, पुण्यात अजित पवार गटाने काँग्रेसला धक्का दिला असून, माजी नगरसेविकेनं संपूर्ण परिवारासह पक्षप्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पवार यांच्या उपस्थितीत आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी परिवार मिलन हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी तसेच त्यांचे सुपुत्र साक्षात शेट्टी आज काँग्रेसची साथ सोडणार आहे. शेट्टी परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar Gains Strength in Pune
शिंदेसेनेचा नेता पोलिसांच्या रडारवर, घरावर टाकला छापा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच कारवाई

शेट्टी कुटुंबाचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात दरारा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेट्टी कुटुंबाने काँग्रेसला जय महाराष्ट्र केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

Ajit Pawar Gains Strength in Pune
कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवानाचा मृत्यू; चंदीगडमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

१०१७ साली महापालिका निवडणुकीत सुजाता शेट्टी काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या. तर, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने सदानंद शेट्टी यांना प्रदेश सरचिटणीस केले होते. पुण्यात काँग्रेसची ताकद वाढत होती. शेट्टी कुटुंब पुण्यात स्थिरावतच असतानाच अजित पवारांनी काँग्रेसला धक्का दिला असल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या नेत्यानं धक्का दिला होता. आज शेट्टी कुटुंबाने धक्का दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com