Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Cough Syrup Alert : यवतमाळ हादरलं! विषारी कफ सिरपमुळे ६ वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात संतापाची लाट

Maharashtra News : मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता यवतमाळमध्ये कफ सिरप घेतल्याने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. अन्न व औषध विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोन औषधांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये कफ सिरपमुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे

  • कळंब तालुक्यातील पिंपळखुटी गावात हा प्रकार घडला आहे

  • अन्न व औषध विभागाने दोन औषध ब्रँडचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत

  • महाराष्ट्रात कफ सिरप विक्रीवर देखरेख आणि चौकशी वाढविण्यात आली आहे

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप लहान मुलांसाठी जीवघेणं ठरलं आहे. या दोन राज्यांनंतर आता यवतमाळ हादरलं आहे. यवतमाळ येथील कळंब तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय चिमुकल्याचा सर्दी खोकल्याची औषध घेतल्याने मृत्यू झाल्याचं धक्कदायक प्रकार समोर आला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी अन्न व औषध विभागाकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरप प्यायल्याने १५ हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला. लहान मुलांना सर्दी आणि खोकला झाल्यानंतर कफ सिरप पाजलं. मात्र, पुढील काही दिवसांत या लहान मुलांना मृत्यूने कवटाळलं. ही सर्व बाधित मुलं ५ वर्षांखाली असल्याचे सर्वेक्षणात उघडकीस आलं आहे. कफ सिरपचं हे पहिलं प्रकरण ७ सप्टेंबर रोजी समोर आलं होतं.

या मुलांना उपचारासाठी नागपूर येथे पाठवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या धक्कदायक प्रकारानंतर महाराष्ट्रात कफ सिरपची विक्री बंद करण्यात आली आहे. मात्र आता महाराष्ट्रातील यवतमाळ येथून देखील असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील ६ वर्षीय चिमुकल्याला सर्दी खोकला झाल्याने त्याला सर्दी खोकल्याची औषध देण्यात आले. मात्र हे औषध घेतल्यानंतर त्याला जास्त त्रास होऊ लागला.

मृत चिमुकल्याच्या कुटुंबियनची त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याची अचानक प्रकृती बिघडली. या कारणास्तव यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलं. यादरम्यान या चिमुकल्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अन्न व औषध विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

मध्यप्रदेशच्या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून दोन ब्रँडच्या कप सिरपचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. हे संवेदनशील प्रकरण असल्याने त्या बाळाची शवचिकित्सा करण्यात आली. दरम्यान याप्रकरणात तपासणी अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मेडिकल प्रशासनाने याची माहिती सहाय्यक आयुक्त यांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women World Cup Final: हातात तिरंगा आणि पाणावलेले डोळे! एकमेकींना मिठी मारल्यानंतर हरमनप्रीत-स्मृतीला अश्रू अनावर

Rohit Sharma Reaction: रोहितला आठवला 19 नोव्हेंबर? महिलांनी वर्ल्डकप जिंकताच स्टँडमध्ये बसलेला हिटमॅन भावूक; रिएक्शन होतेय Viral

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून ट्रॉफी हिसकावली

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

SCROLL FOR NEXT