पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याने आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागांत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार आहे. या काळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.
मध्य उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून ते सध्या एक्टिव्ह आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील श्रीगंगानगर, नर्नूल, कमी दाबाच्या क्षेत्राचं केंद्र, देहरी, पुरूलिया, दिघा मार्गे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे.
दक्षिण गुजरातपासून कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्याचप्रमाणे तेलंगणापासून मन्नारच्या आखातापर्यंतही कमी दाबाचा पट्टा एक्टिव्ह आहे.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालीये. यवतमाळमध्ये राज्यातील सर्वात कमी १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. नैऋत्य मोसमी वारे कोकणात सामान्य स्थितीत आहेत. मात्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हे वारे कमजोर आहेत.
दरम्यान सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमध्ये ७० मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला.
आज उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे, तसंच मराठवाड्यातील जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अन्य भागांत ढगाळ वातावरण राहू शकते. काही ठिकाणी ऊन आणि सावलीचा खेळ सुरू राहून हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीये.
सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणी कमाल आणि किमान तापमानाची नोंद पुढीलप्रमाणे झाली-
पुणे : कमाल २९.४, किमान २१.४ अंश सेल्सिअस
अहिल्यानगर : कमाल तापमान निरंक, किमान २४.४ अंश सेल्सिअस
धुळे : कमाल ३३.०, किमान २०.४ अंश सेल्सिअस
जेऊर : कमाल ३३.५, किमान २१.५ अंश सेल्सिअस
कोल्हापूर : कमाल २९.६, किमान २२.७ अंश सेल्सिअस
महाबळेश्वर : कमाल १९.६, किमान १७.४ अंश सेल्सिअस
मालेगाव : कमाल ३१.०, किमान २०.६ अंश सेल्सिअस
नाशिक : कमाल २८.४, किमान २१.४ अंश सेल्सिअस
निफाड : कमाल २९.५, किमान १९.७ अंश सेल्सिअस
सांगली : कमाल ३०.९, किमान २२.५ अंश सेल्सिअस
सातारा : कमाल २९.१, किमान २१.८ अंश सेल्सिअस
सोलापूर : कमाल ३५.४, किमान २३.९ अंश सेल्सिअस
सांताक्रूझ : कमाल ३०.९, किमान २५.४ अंश सेल्सिअस
डहाणू : कमाल ३२.१, किमान २५.० अंश सेल्सिअस
रत्नागिरी : कमाल ३०.६, किमान २४.६ अंश सेल्सिअस
छत्रपती संभाजीनगर : कमाल ३४.०, किमान २२.२ अंश सेल्सिअस
धाराशिव : कमाल ३३.१, किमान २१.४ अंश सेल्सिअस
परभणी : कमाल ३३.४, किमान २२.५ अंश सेल्सिअस
परभणी (कृषी) : कमाल ३३.८, किमान २१.३ अंश सेल्सिअस
अकोला : कमाल ३५.१, किमान २३.८ अंश सेल्सिअस
अमरावती : कमाल ३२.६, किमान २२.१ अंश सेल्सिअस
भंडारा : कमाल ३२.०, किमान २०.० अंश सेल्सिअस
ब्रह्मपुरी : कमाल ३२.८, किमान २५.१ अंश सेल्सिअस
बुलडाणा : कमाल ३१.५, किमान २२.३ अंश सेल्सिअस
चंद्रपूर : कमाल ३४.६, किमान २५.६ अंश सेल्सिअस
गडचिरोली : कमाल ३१.२, किमान २५.४ अंश सेल्सिअस
गोंदिया : कमाल ३२.२, किमान २१.८ अंश सेल्सिअस
नागपूर : कमाल ३३.४, किमान २१.६ अंश सेल्सिअस
वर्धा : कमाल ३४.०, किमान २३.२ अंश सेल्सिअस
वाशीम : कमाल ३३.२, किमान २०.० अंश सेल्सिअस
यवतमाळ : कमाल २९.२, किमान २०.३ अंश सेल्सिअस
उत्तर महाराष्ट्र : किमान १९.७, कमाल ३३.० अंश सेल्सिअस
पश्चिम महाराष्ट्र : किमान १७.४, कमाल ३५.४ अंश सेल्सिअस
कोकण : किमान २४.६, कमाल ३२.१ अंश सेल्सिअस
मराठवाडा : किमान २१.३, कमाल ३४.० अंश सेल्सिअस
विदर्भ : किमान २०.०, कमाल ३५.१ अंश सेल्सिअस
नंदूरबार, धुळे, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.