Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: विदर्भाला अवकाळी पाऊस झोडपून काढणार, कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट? वाचा आजचे हवामान

IMD Alert For Vidharbha: राज्यात आज पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. आज विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Priya More

राज्यात सध्या ऊन- पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या कडाक्याचे ऊन तर काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडत आहे. पुन्हा राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे त्यामुळे कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. आज विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात आज मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील पारा घसरला आहे. बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आत गेला आहे. मागील काही दिवसांपासून पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर, नागपूरसह, वर्धा, गोंदिया, भंडारा, अमरावती, वाशीम, यवतमाळ भागात तशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ७ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना आणि शेतामध्ये जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‎आज अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली येथे उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. ‎तर, उर्वरीत राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्ण हवामानाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT