Weather Update News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यावर अवकाळीचं सावट! मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पुढील 2 दिवस 'ऑरेंज' अलर्ट

Latest News: मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवड्यात पुढचे दोन दिवस पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट आहे. आधीच अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रतील शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. अशामध्ये मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवड्यात पुढचे दोन दिवस पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुणे हवामान खात्याने (Pune Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट (orange alert) देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील दोन दिवस देखील पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. कारण या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आधीच हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहेत. त्याचसोबत मोसंबी, पपई आणि आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीसोबत पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे.

तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज कोसळून अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. अशामध्ये नुकसानग्रस्त भागांची राजकीय नेत्यांकडून पाहणी सुरु आहे. या नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करुन मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT