Maharashtra Weather google
महाराष्ट्र

Maharashtra Weather : थंडी गायब, हिवाळ्यात निघतोय घाम; पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल, राज्यात कुठे कसं हवामान?

Weather Report Of Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात हे अधिक जाणवत आहे. थंडगार वातावरणाची जागा उबदार तापमानाने घेतली आहे.

Dhanshri Shintre

राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून थंडीची तीव्रता कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात हे अधिक जाणवत आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान हटले असून हलकासा उकाडा जाणवू लागला आहे. थंडगार वातावरणाची जागा उबदार तापमानाने घेतली आहे. आजच्या हवामानाविषयी बोलायचे झाले तर, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना थोडासा उष्णतेचा अनुभव येण्याची शक्यता आहे. बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हवामानाचा पुढील अंदाज जाणून घेण्यासाठी स्थानिक अपडेट्सकडे लक्ष ठेवावे.

पुण्यात १८ जानेवारी रोजी अंशतः ढगाळ आकाश आणि सकाळच्या वेळेस धुकं अनुभवायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या सुमारास उष्णता जाणवणार असून हलकासा उकाडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गरम हवामानाचा विचार करून काळजी घ्यावी. साताऱ्यात आज कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस असेल. जिल्ह्यात आज निरभ्र आकाश राहील, तर पुढील काही दिवसांत किमान तापमानात ३ ते ४ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.

सांगली जिल्ह्यात आज कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. १८ जानेवारीला आकाश निरभ्र असेल, तर पुढील काही दिवसांत किमान तापमान वाढून २१ अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यात आज कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील, तर वाढलेल्या कमाल तापमानामुळे दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे.

Maharashtra Weather

नंदुरबार जिल्ह्यातल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे सातपुड्यातील आंबा बागांना फटका बसतोय. थंड हवामान आणि ढगाळ वातावरणाचा फटका आंब्याचा मोहरांना पडतोय. आंब्यांच्या मोहरांवर थ्रिप्स नामक रोगाची लागट झाल्याची माहिती आहे. आंबा कलमांना थ्रिप्सची लागण टाळण्यासाठी कीटकनाशके फवारणी सुरू आहे. आंब्यावरील बहार टिकवून ठेवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसानंतर पुन्हा आंबा उत्पादक शेतकरी संकटात येण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात आज, १८ जानेवारीला, निरभ्र आकाशाची नोंद होईल. हवामान अंदाजानुसार, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस असेल. पुढील काही दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. नागरिकांनी बदलत्या हवामानाचा विचार करून आवश्यक ती काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT