Maharashtra Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: मुंबईत पावसाचा जोर ओसरला, राज्यात अतिमुसळधार, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Rain Update Today 20th August 2025: राज्यात आजदेखील पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत दुपारनंतर पाऊस कमी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Siddhi Hande

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळधार पाऊस पडत आहे. आजदेखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना गरज असेल तर घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे. राज्यात विविध ठिकाणी शाळा-कॉलेजलादेखील सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान, आज पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. परंतु पालघर आणि नाशिकमधील घाट परिसरात जोरदार पाऊस पडेल असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या.

आज सकाळपर्यंत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे घाट, नाशिक घाट आणि चंद्रपुर या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर, गोंदिया या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

पुढील २४ तास महत्त्वाचे

पुढील २४ तास रायगड व पुणे घाट या जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, सातारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान, दुपारनंतर मुंबईत पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालच्या तुलनेत आज २० ऑगस्ट रोजी मुंबई शहरासह महानगरांमधील इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल.

या ठिकाणी शाळा बंद

रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रायगड, पनवेल महानगरपालिका हद्दीतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. साताऱ्यातदेखील ६ तालुक्यांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.लोणावळा, ठाणे, पालघरमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथेही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

दुर्दैवी! वासरासाठी गोठ्यात धावत गेली अन् घात झाला, मायलेकाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात हळहळ

प्रसिद्ध गायिका राजकीय रिंगणात उतरणार? भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

SCROLL FOR NEXT