Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Mumbai Pune train services cancelled: मुंबईसह पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका रेल्वेसेवेला बसला आहे. त्यामुळे मुंबईवरून पुणे आणि पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.
Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट
Mumbai Pune train services cancelledSaam Tv
Published On

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका रेल्वेसेवेवर मोठ्या प्रमाणात बसला आहे. मुंबईमध्ये कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकलसेवेसोबत लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसची वाहतूक ठप्प झाली. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना उद्या देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाची परिस्थिती लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून मुंबईवरून पुणे आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या अनेक ट्रेन्स रद्द केल्या आहेत. त्याचसोबत इतर राज्यात जाणाऱ्या ट्रेन्स देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी याची आधीच नोंद घ्यावी.

पुण्यावरून उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन एक्स्प्रेस या सर्व रेल्वे उद्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला जाणाऱ्या आणि पुण्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उद्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट
Mumbai Rain: मुंबई-पुण्यात कोसळधार! रेल्वेसेवेला मोठा फटका, डेक्कन एक्स्प्रेससह अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द; वाचा लिस्ट

१९ ऑगस्टला रद्द करण्यात आलेल्या ट्रेन्स -

ट्रेन क्रमांक ११०११ सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक २०७०६ सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक १२१२५ सीएसएमटी – पुणे प्रगती एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक १२१२३ सीएसएमटी – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक ११००८ पुणे – सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक १२१२८ पुणे – सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक २२१०६ पुणे – सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक १२०७१ सीएसएमटी – जालना एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक १२१३९ सीएसएमटी – नागपूर एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक २२२२५ सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक ११००१ सीएसएमटी – बल्लारशाह एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक ११००९ सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक १२१३३ सीएसएमटी – मंगलोर जंक्शन एक्सप्रेस

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट
Bullet Train : मुंबईवरून फक्त २ तासांत अहमदाबादला पोहचणार, ताशी ३२० किमी वेगाने धावणार; 'या' १२ ठिकाणी थांबणार

२० ऑगस्टला या ट्रेन्स रद्द -

ट्रेन क्रमांक ११०१२ धुळे – सीएसएमटी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक २०७०५ जालना – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१२६ पुणे – सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१२४ पुणे – सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक ११००७ सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१२७ सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक २२१०५ सीएसएमटी – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२०७२ जालना - सीएसएमटी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१४० नागपूर - सीएसएमटी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक ११०१० पुणे - सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१३४ मंगलोर जंक्शन – सीएसएमटी एक्स्प्रेस

२१ ऑगस्टला ही ट्रेन रद्द -

ट्रेन क्रमांक ११००२ बल्लारशाह – सीएसएमटी एक्स्प्रेस

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट
Train Accident: धावत्या ट्रेनसमोर उडी मारत तरुणाची आत्महत्या, मृतदेह इंजिनमध्ये अकडून २० किमीपर्यंत फरफटत गेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com